बंगले भाड्याने दिल्यास गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 24, 2015 00:42 IST2015-12-24T00:42:58+5:302015-12-24T00:42:58+5:30
लोणावळा परिसरातील खासगी बंगले भाड्याने दिल्याचे आढळल्यास मालकांवर आयपीसी १८८प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली.

बंगले भाड्याने दिल्यास गुन्हा दाखल
लोणावळा : लोणावळा परिसरातील खासगी बंगले भाड्याने दिल्याचे आढळल्यास मालकांवर आयपीसी १८८प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली.
सुटीच्या कालावधीत खासगी बंगले भाड्याने दिले जातात. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही माहिती दिली जात नसल्याने मागील काळात रेव्ह, तसेच मद्य पार्ट्यांचे प्रकार घडले आहेत. हॉटेल असोसिएशननेही खासगी बंगल्यांवर कारवाईची मागणी केली असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विनायक ढाकणे म्हणाले, ‘‘पुणे शहर व जिल्ह्यातील एक भाग दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ मुंबईपासून जवळ असल्याने येथे कायमच हायअलर्ट असतो. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दहशतवादी कारवाया एका दिवसात होत नाहीत. त्याकरिता प्रथम ठिकाणाची रेकी केली जाते. काही लोक त्या भागात अगोदर काही दिवस राहून जातात. अशा घटना पूर्वी घडल्या आहेत.
याकरिता हॉटेलमालकांनी हॉटेलचा तपशिलांसह नकाशा
तयार करून पोलीस स्टेशनला
द्यायला हवा, जेणेकरून काही घटना घडल्यास आॅपरेशन राबविणे सोपे जाईल.’’
निरीक्षक पाटील म्हणाले, ‘‘हॉटेल मालकांनी हॉटेलचा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कव्हर करावा. हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व गिऱ्हाइकांच्या ओळखपत्रांची झेरॉक्स २४ ते ३१ डिसेंबरदरम्यान शहर पोलिसांकडे सादर कराव्यात.
तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांची, तसेच सामानाची तपासणी करण्यासाठी एसएचएमडी हे यंत्र कार्यान्वित करावे. ज्या हॉटेलांमध्ये मनोरंजन कार्यक्रम आहेत, त्यांनी गर्दीत काही
अनुचित प्रकार घडणार
नाही, याची खबरदारी घ्यावी. खासगी बंगले भाड्याने
देताना कोणी सापडल्यास आयपीसी १८८प्रमाणे कारवाई करणार आहोत.’’ (वार्ताहर)