शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

टेबलखुर्च्या टाकल्या काढून; बसण्यास मनाई केल्याने हवेली तहसील कार्यालयावर वकिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:35 IST

पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशुक्रवार पेठ येथील खडकमाळ आळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारापाशी आंदोलन वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई

पुणे : पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शुक्रवार पेठ येथील खडकमाळ आळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन  ही पुणे बार असोसिएशनशी सलग्न बार असोसिएशन आहे. तहसीलदार कचेरीतील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार नुकतीच कारवाई होऊन संबंधीत कर्मचारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडला होता व त्याला अटक झाली होती. त्या प्रकरणानंतर चिडून जाऊन या कर्मचाऱ्याने लोकायुक्तांकडून हवेली तहसीलदार कार्यालयात अतिक्रमण केल्याविरुद्ध तक्रार केली होती़ त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार कचेरीत काम करणाऱ्या वकिलांच्या टेबल खुर्च्या काढून टाकण्यात आल्या.तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार गीता दळवी यांना निवेदन देण्यात आले व आमच्या जागा आम्हाला पूर्ववत द्याव्यात व तहसीलदार कचेरीत कायदेशीर काम व वकीली व्यवसाय करायला अडथळा आणू नये़ तसे न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला असल्याचे अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले.या आंदोलनात पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड मिलींद पवार, तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड़ राजश्री रा. अडसूळ-जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड़ मच्छिंद्र नागपूरे, सचिव महेश सकट, सह-सचिव अ‍ॅड. अनिता ठाकुर, अ‍ॅड. मुरलीधर तावरे, अ‍ॅड. चक्रधर काळे, अ‍ॅड. सुभाष ओसवाल, अ‍ॅड. लक्ष्मण कांंबळे, अ‍ॅड. शमा शिंदे, अ‍ॅड. अनिल पाटील, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव अ‍ॅड. सचिन हिंगणेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे