शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवा; नव्यांना संधी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 22:30 IST

काँग्रेस पक्षाच्या संघटनेत राज्यात अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू

ठळक मुद्देपक्ष निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची मागणी : थोरातांनी पाठवले निरीक्षक

राजू इनामदार - पुणे : मध्य प्रदेशातील काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाराज पक्ष पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला. नव्यांना संधी द्या, अशी मागणी काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाने पाठवलेल्या निरिक्षकांकडे केली. पुण्यातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी पक्षाचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांना पुण्यात पाठविले. अन्य शहरांमध्येही हा प्रयोग राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनेत अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू आहे. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पदांवर ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जात नाही. तेच शहराध्यक्ष, तेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदांवरही तेच तेच नगरसेवक यामुळे गेली अनेक वर्षे पक्षाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला, नव्यांना संधी द्या, अशी मागणी पुण्यासह अनेक शहरांमधून होत आहे.पुण्यातल्या काहींनी त्याबाबत प्रदेश शाखेला लेखी पत्र दिले होते. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी शर्मा यांना पाठविले. त्यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या आजी-माजी आमदार, नगरसेवक, तसेच प्रमुख पदाधिकाºयांची भेट घेतली. अन्य काही पदाधिकारीही वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की कार्यकर्ते, पदाधिकारी काम करीत असतात. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रदेशाध्यक्षांची थोरातांची भावना आहे. त्यांच्याच सूचनेवरून हा संवाद साधण्यात आला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊ. पालिकेतील गटनेतेपद व शहराध्यक्ष याबाबत सर्वांशी बोललो. काय बोलणे झाले, याचा तपशील देण्यास शर्मा यांनी नकार दिला व प्रदेशाध्यक्ष याबाबतीत सांगतील, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. त्यांनी पाच विभागीय कार्याध्यक्ष नियुक्त केले. विधानसभा निवडणुकीनंतर त्या पाच विभागीय कार्याध्यक्षांपैकी खुद्द प्रदेशाध्यक्ष थोरात हेच मंत्री झाले. त्याशिवाय विश्वजित कदम यांच्यासह अन्य तीनही मंत्री झाले. त्यामुळे या कार्याध्यक्षांचे पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्याची दखल थोरात यांनी घेतल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRahul Gandhiराहुल गांधी