निर्बंध हटविल्याने दिलासा
By Admin | Updated: December 22, 2016 02:02 IST2016-12-22T02:02:26+5:302016-12-22T02:02:26+5:30
खातेदारांना बँकेत जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांद्वारे पाच हजाराहून अधिक रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच भरण्याबाबत

निर्बंध हटविल्याने दिलासा
देहूरोड : खातेदारांना बँकेत जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांद्वारे पाच हजाराहून अधिक रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच भरण्याबाबत आरबीआयने निर्बंध घातल्याने देहूरोड, किवळे -विकासनगर व रावेत परिसरातील बहुतांशी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. रद्द झालेल्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यास मंगळवारी व बुधवारी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, बुधवारी दुपारनंतर माध्यमांद्वारे नोटा जमा करण्याचे निर्बंध हटविल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बंद एटीएमचे दरवाजे पाहून नागरिकांना घरी परतावे लागत आहे. विकासनगर येथील विजया बँक व देहूरोड येथील स्टेट बँकेच्या एटीएमवर नियमित पैसे उपलब्ध होत असल्याने एटीएमसमोर पैसे येण्याअगोदरपासून नागरिक रांगा लावून थांबत असल्याचे चित्र बुधवारीही दिसून आले. नोटाबंदीला सव्वा महिना उलटनूही बँका व एटीएमसमोरील रांगा कमी होत नसल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय ‘जैसे थे’ असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसत आहे. (वार्ताहर)