पुण्यात रिमझिम
By Admin | Updated: September 14, 2015 04:51 IST2015-09-14T04:51:38+5:302015-09-14T04:51:38+5:30
शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी काहीशी विश्रांती घेतली. रविवारी सायंकाळनंतर शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

पुण्यात रिमझिम
पुणे : शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी काहीशी विश्रांती घेतली. रविवारी सायंकाळनंतर शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. लोहगाव परिसरात मात्र पावसाच्या काही जोरदार सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ०.३ मिमी. पावसाची नोंद झाली. लोहगावसह काही उपनगरांमध्ये मात्र पावसाला काहीसा जोर होता. सोमवारी व मंगळवारी दुपारनंतर किंवा सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
धरण क्षेत्र कोरडेच
शहरात रिमझिम पाऊस अधूनमधून येत असला तरी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्र आज कोरडे ठणठणीत होते़ चारही धरणाच्या परिसरात कोठेही पावसाची नोंद झाली नाही़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात वरसगाव २४, पानशेत १७, टेमघर १, खडकवासला ४ मिमी नोंद झाली होती़