मेहुणीच्या खुनाचे गूढ उकलले

By Admin | Updated: February 16, 2017 03:26 IST2017-02-16T03:26:16+5:302017-02-16T03:26:16+5:30

मेहुण्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या मेव्हणीचा

Remembered the mysteries of sister-in-law | मेहुणीच्या खुनाचे गूढ उकलले

मेहुणीच्या खुनाचे गूढ उकलले

पुणे : मेहुण्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या मेव्हणीचा थंड डोक्याने केलेला खून स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून केल्यावर चाकणला पुरलेला मृतदेह परत उकरून काढत बार्शी तालुक्यातील एका शेतामध्ये जाळण्यात आला. जळालेल्या मृतदेहाची शिल्लक राहिलेली हाडे आणि कवटीसुद्धा आरोपींनी दगडाने ठेचून भुगा करून नष्ट केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांनी दिली.
अश्विनी शिवकुमार परदेशी (वय २५, रा. गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी गोविंद ताकभाते (रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ही ५ जानेवारी रोजी मिसिंग झाली होती. याबाबत तिची आई राजश्री यांनी फिर्याद दिली होती. अश्विनीचे नदीम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पोलिसांनी ती त्याच्यासोबत पळून गेल्याचा संशय व्यक्त करीत त्याच्याकडे चौकशी केली. परंतु, अश्विनीच्या संमतीनेच त्याचे दोन महिन्यांपूर्वी त्याच्याच धर्मातील एका तरुणीसोबत आईवडिलांनी लग्न लावून दिल्याचे समोर आले.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांना वेगळीच शंका आली. त्यांनी अश्विनीची बहीण स्वाती हिच्याकडे महिला उपनिरीक्षक क्षीरसागर, पोलीस शिपाई श्रद्धा अकोलकर यांच्या मदतीने चौकशी सुरू केली. स्वाती हिचे गोविंदसोबत आळंदीमध्ये लग्न झाले होते. गोविंदच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तो सहा महिन्यांमधून कधीतरी येऊन स्वातीजवळ राहायचा. त्यांना दोन
मुले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Remembered the mysteries of sister-in-law