शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात संघमित्राची उल्लेखनीय कामगिरी; बारामतीत कार्यकर्त्यांकडून थेट हत्तीवरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:51 IST

केवळ २१ वर्षांच्या संघमित्रा चौधरी या युवतीने बसपा कडून निवडणूक लढवत नगरसेवक होण्याचा मान मिळवला आहे

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवलं. बारामतीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षही राष्ट्रवादीचा झाला आहे. मात्र अजित पवारांच्या बारामती बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट धावला. अवघ्या एकवीस वर्षांची तरुणी नगरसेवक बनली. बारामतीतील प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळुराम चौधरी या विजयी झाल्या आहेत. केवळ एकवीस वर्षांची संघमित्रा यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांनतर तिचं सर्वत्र कौतुक होऊ लागल आहे. बारामतीत संघमित्राची बसपा कार्यकर्त्यांनी थेट हत्तीवरून मिरवणूक काढली.

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात या युवतीने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.  ती सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असून तिला उत्तम ज्ञान असल्याचा विचार करत लोकांनी नगरसेवक बनवले. आता इथून पुढे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे. आपल्या प्रभागापासून सुरुवात करत विकासाची वाट धरणार आहे. अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करणार असल्याचे तिने सांगितले आहे. 

काळुराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे राज्याचे महासचिव असून मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वीही नगरपरिषदेसह विधानसभा व लोकसभेचीही निवडणूक लढवली आहे. यांना एकदाही यश मिळालं नव्हतं. पवार कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या चौधरी यांच्या लेकीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. यंदा त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. बसपाच्या तिकिटावर चार ठिकाणी उमेदवार उभे केले. दिल्लीत वकिली करणाऱ्या मुलीला बारामतीत बोलावून घेत तिला उमेदवारी दिली. उच्चशिक्षित मुलीनेही दमदार भाषणे करत प्रभाग गाजवला. थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव तिने केला. वयाच्या २१ व्या वर्षीच ती नगरसेवक झाली आहे.

सगळ्या बारामतीकरांचं आभार व्यक्त करतो 

मला बारामतीकर आणि माझ्या बहुजन समाज आहे. त्या बहुजन समाजानी जे माझ्या लेकीला आज विजयी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी प्रथमतः सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार व्यक्त करतो. हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरू झालेला आहे. तेव्हा शाहू महाराज, बाबासाहेब कांशीराम आणि माझ्या लेकीला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती. आकाश टीम बनायला देशात सुरुवात झालेली आहे. SC, ST, OBC सर्व मराठा बांधवांचं देखील माझ्या प्रभागामध्ये होती. मला त्यांनी  सहकार्य केलं. त्या सर्वांचे आभार! - काळुराम चौधरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanghamitra's victory in Ajit Pawar's stronghold; procession on elephant

Web Summary : In Baramati, Sanghamitra Choudhary, a 21-year-old BSP candidate, won against NCP. Daughter of Kaluram Choudhary, she fulfilled her father's dream. Her victory was celebrated with an elephant procession.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारणMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६nagaradhyakshaनगराध्यक्ष