धार्मिक कार्यक्रमांनी गुरुनानक जयंती साजरी
By Admin | Updated: November 7, 2014 00:11 IST2014-11-07T00:11:53+5:302014-11-07T00:11:53+5:30
विविध धार्मिक कार्यक्र मांनी पिंपरी-चिंचवड शहरात गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून गुरुद्वारामध्ये शिख भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

धार्मिक कार्यक्रमांनी गुरुनानक जयंती साजरी
पिंपरी : विविध धार्मिक कार्यक्र मांनी पिंपरी-चिंचवड शहरात गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून गुरुद्वारामध्ये शिख भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
वाल्हेकरवाडी येथील मानसरोवर गुरु द्वारा आश्रमाच्या वतीने गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी केली. बुधवारी रात्री दरबारमध्ये सव्वा एकला संत गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. तर रात्री अडीचच्या सुमारास वाल्हेकरवाडी परिसरातून पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली. या पालखीमध्ये गुरु ग्रंथसाहेब आणि गुरु नानक साहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. बँड, भजन, किर्तन अशी भक्तीगीत म्हणत सुमारे दोन हजार भाविक या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. या पालखीसमोर सादर केलेला तलवारबाजीचा खेळ या मिरवणुकीत प्रेक्षणीय होते. गुरुद्वारापासून ही पालखी निघाली. आकुर्डी रेल्वेस्टेशनचे प्रवेशद्वार-संत नामदेव मार्ग-वाल्हेकरवाडी मार्ग- डी. वाय. पाटील मार्ग-मोनीबाबा आश्रम मार्गाने ही पालखी गुरु द्वारामध्ये आली, अशी माहिती डॉ. मंजितसिंग खालसा यांनी दिली. (प्रतिनिधी)