शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'धर्म' हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही: फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:17 IST

सध्या कोरोनाच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे.

ठळक मुद्देआजचा ( शुक्रवारी) चा ' गुड फ्रायडे' चा दिवस ख्रिश्चन धर्मीयांमध्ये अत्यंत महत्वाचा

नम्रता फडणीस- पुणे : 'धर्म' हा माणसाचे अध्यात्मिक जीवन सुकर करण्यासाठी आहे.सध्या कोरोनाच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे.  'धर्म'  हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही, असे परखड विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.आजचा ( शुक्रवारी) चा ' गुड फ्रायडे' चा दिवस ख्रिश्चन धमीर्यांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जातो. कारण याच दिवशी ख्रिश्चन धमार्चे प्रवर्तक प्रभू येशू यांनी प्राणाची आहुती दिली. हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळे या दिवशी सर्व ख्रिश्चन धर्मिय बांधव चर्च मध्ये जाऊन येशू ख्रिस्त यांचे स्मरण करतात. या दिनाचे औचित्य साधत ' लोकमत' ने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील जगाच्या उद्धारासाठी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला. जगाचं भल व्हावं ही त्यामागची इच्छा होती. शक्तीने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना बलिदान द्यावे लागले.. समाजाच्या हितासाठी  बलिदानाला तयार व्हा असा संदेश प्रभू येशूने मानवजातीला दिला आहे. आजही या कोरोना लढ्यात शेकडो डॉकटर्स आणि नर्स एकप्रकारे बलिदानच देत आहेत. त्याकरिता प्रभूची कृपा आणि प्रेरणा आपल्या पाठीशी आहे. कोरोनाचे उद्भवलेले हे संकट जगव्यापी आहे. आपण सर्वजण कोरोनाशी लढा देताना जवळपास हतबल झालो आहोत. दु:ख आणि वेदना हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  त्यातून मुक्त होऊ शकत नाही. तरी आपण प्रयत्न करीत आहोत. यातून आपण नक्की बाहेर पडू असा मला विश्वास आहे.   ' धर्म हा माणसाचे अध्यात्मिक जीवन सुकर करण्यासाठी आहे. सध्याच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे..सर्वात मोठा धर्म हा माणुसकीचा आहे. तो आपल्याला वाचवायचा आहे. यासाठी या काळात स्वत:वर बंधने घालून घेणे आवश्यक आहे.सध्या  ख्रिस्त धमार्चा पवित्र महिना सुरू आहे. मात्र चर्च बंद असल्याने आम्ही आॅनलाईन प्रार्थना करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले..........................    ' कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे घरातच लेखनकाम करत आहे. नोबेल पारितोषिक विजेत्यांची भाषणे ऐकत आहे. त्यातून खूप काही करण्याची स्फूर्ती मिळत आहे- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

टॅग्स :Puneपुणे