शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:32 IST

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे

पुणे: पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसली आहे आहे. या विषाणूचे आतापर्यंत १११ संशयित रुग्ण शहरात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ०५ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ८६, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असे एकू्न १११ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. १११ रुग्णांमध्ये ७७ पुरुष रुग्ण तर ३४ महिला रुग्ण असून यापैकी १३ रुग्ण हे अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान, मंगळवारी नव्याने रुग्ण वाढले नाहीत. यामुळे दिलासा नागरिकांना काहीसा मिळाला आहे. एकूण रुग्णसंख्येत ० ते ९ आणि १० ते १९ वयोगटातील मुलांची संख्या अधिक ३७ इतकी आहे. तर ६० ते ६९ वयोगटातील व्यक्तींची संख्या ८ आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृध्द व्यक्तींची (प्रतिकारशक्ती कमी असलेले) विशेष काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या

गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात असेही डॉक्टर म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाkamla nehru hospitalकमला नेहरु हॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी