शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची सुटका : परराज्यांतूनही घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:18 IST

शहरात डिसेंबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तब्बल 714 अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्दे शहरात डिसेंबर ते मे दरम्यान ७१४ अल्पवयीन हरविल्याच्या तक्रारींची नोंद

पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने वेगवेगळ्या जिल्हयातील पाच अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. प्रेमप्रकरणातून त्यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात डिसेंबर ते मे या कालावधीत तब्बल 714 अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची पोलिस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याकरिता पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस आयुक्ताअंतर्गत एक व विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.  परराज्यासह पुणे जिल्ह्यातून या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  प्रत्यक्षात बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध गांभीर्याने घेतला जात नाही. यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष उपाययोजना राबविण्याचे हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणाती पाच अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला. यातील आरोपींना संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मांजरी येथून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. तपासामध्ये महादेव आंधळे(रा.मांजरी, मुळ वाशीम)यास माण मुळशी येथून ताब्यात घेऊन मुलीची सुटका करण्यात आली. तसेच आणखी एका मुलीची चेतन साईनाथ जाधव(23,रा.हडपसर, शांतीनगर) याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2017 रोजी कोंढव्यातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तपास शाहरुख सादीक शेख (कोंढवा) याने फुस लावून पळवून नेले होते. तिची सुटका कर्नाटकमधील विजापूर येथून करण्यात आली. तर दिघी पोली ठाण्याच्या हद्दीतून 2015 मध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. तीची सुटका सोमनाथ गुलाब कुंभार(रा.आळंदी) याच्या ताब्यातून करण्यात आली. चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2018 मध्ये जनवाडी येथून एका अल्पवयीन मुलीला पळवले होते. तिची सुटका अनिकेत बबनराव गायकवाड(रा.दौंड) याच्या ताब्यातून लवासा मुळशी येथून करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेKidnappingअपहरणPoliceपोलिसWomenमहिला