शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फेरविचाराने मिळेल दिलासा : बिंदुमाधव खिरे; भिन्नलिंगी, समलिंगी, तृतीयपंथीयांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:42 IST

कलम ३७७वर फेरविचार झाल्यास त्याचा भिन्नलिंगी, समलिंगी आणि तृतीयपंथीयांना फायदा होऊ शकणार आहे. आगामी दोन वर्षांत याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये समलिंगी संबंधांना ठरवले होते बेकायदा३७७ कलमावरील निर्णयाचा फेरविचार समलिंगींसाठी आशादायक

पुणे : समलैंगिक संबंध गुन्हा असल्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दाखविलेली तयारी समलैंगिकतेविषयी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा देणारी असून कलम ३७७वर फेरविचार झाल्यास त्याचा भिन्नलिंगी, समलिंगी आणि तृतीयपंथीयांना फायदा होऊ शकणार आहे. आगामी दोन वर्षांत याबाबतचा निर्णय अपेक्षित असून आधारकार्डसंबंधीचा निकाल यामध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने समलिंग संबंधांशी संबंधित ३७७ कलमावर आपल्याच निर्णयावर फेरविचार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने समलिंगींच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याविरोधात काही जण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये समलिंगी संबंधांना बेकायदा ठरवत याबाबत संसदेमध्ये कायदा करण्याचे सुचविले होते. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ दाखल करण्यात आली होती. खूप कमी वेळा क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेतली जाते. मात्र, ही याचिका दाखल करून घेत दीड वर्षापूर्वी न्यायमूर्तींनी पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी घेऊ, असे सांगितले होते. 

 

सरकारची मतेही मागविली

  • काही महिन्यांपूर्वीच्या आधार कार्डमधील वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे हा मूलभूत अधिकार आहे का नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींनी सुनावणी घेतली होती. याबाबत सरकारची मतेही मागविण्यात आली होती. 
  • गुप्ततेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. हा निर्णय ३७७ कलमासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे खिरे यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे ३७७ कलम कायम राहण्यास फारसा वाव नाही. 
  • ३७७ कलमावरील निर्णयाचा फेरविचार घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दाखविलेली तयारी समलिंगींसाठी आशादायक आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी असणे हा गुन्हा ठरवल्यानंतर तीन चार महिन्यांतच एका खटल्यात तृतीतपंथीयांना कायद्याने स्वतंत्र ओळख दिली होती. 
  • मात्र, त्यांना अधिकार देतानाच लैंगिक अधिकारांबाबत मात्र उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे नव्याने येऊ शकणाऱ्या निकालाचा तृतीयपंथीयांनाही फायदा मिळेल, अशी शक्यता खिरे यांनी व्यक्त केली. 
टॅग्स :Puneपुणे