शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

मावळत्या महापौरांचा लंडन दौऱ्याला नकार

By admin | Updated: February 25, 2016 04:10 IST

लंंडनचा दौरा हा तेथील काही सरकारी विभागांनी फार पूर्वीच आयोजित केलेला आहे. त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचेही नियोजन झालेले आहे. त्यामुळे आता ऐन वेळी दौरा रद्द

पुणे : लंंडनचा दौरा हा तेथील काही सरकारी विभागांनी फार पूर्वीच आयोजित केलेला आहे. त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचेही नियोजन झालेले आहे. त्यामुळे आता ऐन वेळी दौरा रद्द करणे अयोग्य असल्याचे सांगून आयुक्त कुणाल कुमार यांनी आपण लंडन दौऱ्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मात्र आपण त्या वेळी महापौरपदावर नसल्यामुळे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.स्मार्ट सिटीसंदर्भातील आयुक्त कुणाल कुमार यांच्या या दौऱ्यावरून सध्या पालिकेत चर्चा सुरू आहे. २९ फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम पालिकेचे सन २०१६-१७चे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. नेमक्या याच वेळी आयुक्त तर नसतीलच; पण त्यांच्यासमवेत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (विशेष) अनिल पवार, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला हे पालिकेचे महत्त्वाचे अधिकारीही लंडनला जाणार असल्याने तेही नसतील. त्यावरून स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.पालिकेचे अंदाजपत्रक महत्त्वाचा विषय आहे. पुणेकरांसाठीही तो जिव्हाळ्याचा आहे. अशा वेळी पालिकेचे प्रमुख असलेले आयुक्त व अन्य महत्त्वाचे अधिकारीच लंडनच्या दौऱ्यावर जाणार असतील, तर तो पुणेकरांचा एक प्रकारचा अपमानच आहे. त्यांचा अभ्यास दौरा नंतरही होऊ शकतो, असे कदम यांचे म्हणणे आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी यावर काहीही न बोलता हा दौरा पूर्वनियोजित असल्याने आपण जाणार असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीमधील प्रकल्प जे राबविणार आहेत, अशा काही अधिकाऱ्यांनाही आणण्याबाबत संबंधित अधिकारी आग्रही असल्यामुळेच वाघमारे, पवार, बोनाला यांचाही दौऱ्यात समावेश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या दौऱ्यात आपण सहभागी होणार नसल्याचे सांगितले. दौरा होणार आहे त्या वेळी आपण पदावर नसू; त्यामुळे दौऱ्यात नाव असले तरीही सहभागी होणे अयोग्य असल्याने आपण जाणार नाही, असे ते म्हणाले. बापट यांचेही नाव या लंडन दौऱ्यात आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; मात्र ते जाणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.