खेडच्या पूर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:11 IST2021-03-25T04:11:55+5:302021-03-25T04:11:55+5:30
दावडी, निमगाव, धामणटेक, गोसासी या परिसरात वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर विजेचे खांब कोलमडले. त्यामुळे अनेक ...

खेडच्या पूर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करा
दावडी, निमगाव, धामणटेक, गोसासी या परिसरात वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर विजेचे खांब कोलमडले. त्यामुळे अनेक घरातील वीज कनेक्शन बंद आहेत. ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. निमगाव येथील कव्हाळा ठाकरवाडी येथे एका घरावर विजेचा खांब तसाच पडून आहे. या परिसरातील वादळात पडलेले विजेचे खांबाची दुरुस्ती करावी, जे वादळात वाकलेले खांब व तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वीजमंडळाच्या अधिकाऱ्याकडे निवेदन दिले आहे.
यावेळी गुळाणीचे सरपंच माऊली पिंगळे, गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, माजी सरपंच मारूती सातकर, दावडीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते खेड तालुका शिवसेनेचे युवा सरचिटणीस धंनजय पठारे, विशाल पोतले उपस्थित होते.
२४ दावडी