शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये नियमित शस्त्रक्रिया सुरू होणार; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 12:33 IST

लॉकडाऊन लागू झाल्यापासून ससून रुग्णालयामधील सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत...

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू लॉकडाऊनपूर्वी रुग्णालयात दररोज सुमारे ५० जोखमीच्या तर सुमारे १२५ अन्य शस्त्रक्रिया

पुणे : लॉकडाऊन काळात ससून रुग्णालयात बंद करण्यात आलेल्या नियमित शस्त्रक्रिया टप्प्याटप्याने सुरू केल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांचा ताण कमी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून ससून रुग्णालयामधील सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण आपत्कालीन व आवश्यक शस्त्रक्रिया या काळात सुरू होत्या. हे प्रमाण तुलनेने खुप कमी होते. कोविड केंद्रामध्ये एप्रिल महिन्यापासून रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांच्या उपचारांवरही परिणाम झाला. पण मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्यानंतर रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच आता कोरोनाबाधित रुग्णांचा ताणही कमी झाला आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.

लॉकडाऊनपूर्वी रुग्णालयात दररोज सुमारे ५० जोखमीच्या तर सुमारे १२५ अन्य शस्त्रक्रिया होत होत्या. सध्या हे प्रमाण अनुक्रमे केवळ १५ व २० एवढेच आहे. लॉकडाऊन काळात प्रामुख्याने सिझेरीयन, हृदयविकार आदी शस्त्रक्रिया होत्या. अनलॉकमध्ये आता अपघात होऊ लागल्याने जखमी रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. आता अन्य शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सुचनाही विभागांना दिल्या आहेत. या शस्त्रक्रिया फार दिवस पुढे ढकलता येणार नाहीत. पण त्यामध्ये एकदम वाढ केली जाणार नाही. टप्याटप्याने या शस्त्रक्रिया सुरू होतील. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी अचानक वाढ झाल्यास त्यावर परिणाम व्हायला नको, म्हणून ही दक्षता घेतली जाणार आहे.-----------लॉकडाऊनमध्ये बहुतेक सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे. मनुष्यबळही उपलब्ध होत आहे त्यामुळे आता लॉकडाऊन काळात थांबविण्यात आलेल्या शस्त्रक्रिया टप्य्याटप्याने सुरू करणार आहेत.- एस. चोकलिंगम, विशेष कार्य अधिकारी, ससुन रुग्णालय व जमाबंदी आयुक्त--------------ससून रुग्णालयातील शस्त्रक्रियांची स्थितीलॉकडाऊन पुर्वीजोखमीच्या - ५०अन्य - १२७सद्यस्थितीतजोखमीच्या - १५अन्य - २०----------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटल