शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अग्निशमनकडून कधी होणार नियमित तपासणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:00 AM

पुणे : अग्निशमन दलाकडून मॉल, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, दुकाने आदी व्यावसायिक आस्थापनांच्या दर सहा महिन्यांनी योग्य प्रकारे तपासण्या होऊन त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे.

दीपक जाधवपुणे : अग्निशमन दलाकडून मॉल, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, दुकाने आदी व्यावसायिक आस्थापनांच्या दर सहा महिन्यांनी योग्यप्रकारे तपासण्या होऊन त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. मात्र मनुष्यबळाअभावी व तपासणीचे अधिकार फक्त वरिष्ठ अधिका-यांकडेच असल्याने प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन तपासण्या होऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातील जवानांना सेवाज्येष्ठतेनुसार याबाबतचे प्रशिक्षण आणि तपासणीचे अधिकार दिले जाणे आवश्यक आहे.मुंबईच्या कमला मिलमधील पबला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. पबमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याने आगीची तीव्रता वाढून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याप्रकरणी अग्निशमन अधिका-यासह महापालिकेच्या ५ अधिका-यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मात्र एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर कारवाईचा बडगा उचलण्यापेक्षा फायर अ‍ॅक्टमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जाणे आवश्यक आहे.व्यावसायिक आस्थापनांचे अग्निशमन परवान्याचे दर ६ महिन्यांनी नूतनीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या वेळी अधिकाºयांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासण्या न होताच बहुतांश परवाने दिले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी अनेकदा अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविलेली नसते. त्याचबरोबर अग्निशमन परवान्याचे नूतनीकरणही केले जात नाही. केंद्रप्रमुखांकडे नूतनीकरणासाठी येणाºया प्रत्येक आस्थापनेच्या जागेवर जाऊन तिथली तपासणी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार फायरमनना त्याबाबतचे प्रशिक्षण व अधिकार दिले जाणे आवश्यक आहे. केंद्रप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली अशी एखादी समिती स्थापन करून या तपासण्या होणे आवश्यक असल्याचे मत अग्निशमन दलातून व्यक्त केले जात आहे. व्यावसायिक आस्थापनांची थेट तपासणी करण्याचे अधिकार केवळ मुख्य अग्निशमन अधिका-यांना देण्यात आले आहेत. मात्र एखाद्या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा योग्य प्रकारे ठेवण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यास त्याची तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार केंद्रप्रमुखांना दिले जाणे आवश्यक आहे. मात्र अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी तेकेवळ वरिष्ठ अधिकाºयांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत. यामध्येबदल झाल्याशिवाय तपासण्या होणार नाहीत.सातत्याने आग लागण्याच्या दुर्घटना घडून त्यामध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्तीत जास्त भर दिला जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.>आग नियंत्रणात आणण्याचा घसरू लागला दर्जाअग्निशमन दलात अधिकारी व जवानांकडून आग किती वेळात नियंत्रणात आणली, याला मोठे महत्त्व आहे. सध्या छोट्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे. दलातील जवानांच्या प्रशिक्षणाचा अभाव हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर इतर कारणांचा शोध घेऊन आग नियंत्रणात आणण्याची वेळ कमीत कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.>लक्षात आणून देऊनहीहोईना चुकांची दुरुस्तीमहापालिकेच्या अधिकृत टिष्ट्वटरवरून शहरातील अग्निशमन केंद्रांचे चुकीचे नंबर पोस्ट केले जात आहेत. विशेष म्हणजे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी रिटिष्ट्वट करत हे नंबर चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देऊनही पुन्हा पुन्हा चुकीचे नंबर पोस्ट केले जात आहेत.>८ वर्षांत केवळ दोघांनापाठविले प्रशिक्षणालानागपूर येथे अग्निशमन उप-केंद्रप्रमुखपदाचा कोर्स करण्यासाठी ८ वर्षांत केवळ दोघा जवानांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणे जवळजवळ थांबलेले आहे. मनुष्यबळ नसल्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडून केली जात आहे. त्याचवेळी अग्निशमनच्या जवानांना या प्रशिक्षणासाठी पाठविलेच जात नसल्याचे दिसून येत आहे.>संकलित माहितीचा अभावअग्निशमन दलाकडून शहरातील किती व्यावसायिक आस्थापना व निवासी इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र दिले. त्यापैकी किती ठिकाणांची तपासणी झाली. आग लागू शकतील, अशी संवेदनशील ठिकाणे कोणती, झोपडपट्ट्यांची अंतर्गत परिस्थिती आदी एकत्रित माहिती अग्निशमन दलाकडे उपलब्ध नाही.>आग लागल्यानंतर ही घ्यावी दक्षताबंद दारे व खिडक्या उघडाव्यातदार बंद करून खोली, बाथरूममध्ये थांबू नयेआगीची दिशा लक्षात घेऊन लवकरात लवकर मोकळ््या जागेत (टेरेस अथवा खाली) जावेधुराच्या त्रासापासून वाचण्यासाठी ओले कापड नाकाला बांधावेरांगत अथवा खाली वाकून बाहेर पडावे