शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

भंगार वेचणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:05 PM

अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका बिल्डरने मावळ येथे बलात्कार केला होता. या गंभीर स्वरूपाच्या खटल्यात काही साक्षीदार फितूर होऊनसुद्धा आरोपीला शिक्षा झाली.... हे विशेष ..!

ठळक मुद्देवैद्यकीय पुरावे महत्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा २२ जून २०१२ रोजी मावळ येथील वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीतील घटना

पुणे : भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.  आयुब कासीम पटेल (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे शिक्षा देण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीला दत्तक घेतलेल्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ जून २०१२ रोजी मावळ येथील वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीत हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. आरोपी पटेल हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर पीडित मुलगी ही अनाथ असून तिला एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या अल्पवयीन मैत्रिणींबरोबर भंगार गोळा करण्यासाठी गेली असताना आरोपीने चौघींना जबरदस्तीने इमारतीतील पंपींग स्टेशन येथे डांबून ठेवले. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला चौथ्या मजल्यावर नेवून तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला. त्यातील एक मुलगी गर्भवती असताना देखील तिच्यावर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी आरडा ओरडा केला. परंतु, हा परिसर जास्त वर्दळीचा नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणी आले नाही. परंतु, आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डांबून ठेवलेल्या मुलींपैकी एक मुलगी आरोपीला चुकवून पळून गेली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास केला. अ‍ॅड. उज्ज्वला रासकर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयीन कामकाजात पोलीस नितीन पवार यांनी मदत केली. 

.................

साक्षीदार फितूर होऊनही पटेलला शिक्षा पीडित मुलीच्या मैत्रिणी खटल्यात फितूर झाल्या होत्या. मात्र, पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावे महत्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बांधकाम साईटवरील साहित्य चोरल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी मुलीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा बचाव पटेल यांच्या वकिलाने केला होता. 

टॅग्स :mavalमावळRapeबलात्कारPoliceपोलिसCourtन्यायालय