शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:59 IST

सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे..

ठळक मुद्दे'मराठवाडा रत्न पुरस्कार' प्रदान समारंभ जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा निजामाच्या हुकूमशाही विरोधातला लढा होता.त्याला हिंदु, मुस्लिम हा रंग देता कामा नये. सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे येथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. हे मराठवड्यासाठी फार धोका दायक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वक्त केले. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी  माजी खासदार रवी गायकवाड, धमार्दाय सह-आयुक्त दिलीप देशमुख, माजी पोलिस महानिरीक्षक (कारागृह) विठ्ठल जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक यशवंत मानखेडकर आणि योगीराज वेणीमाधव गोसावी (पैठणकर), प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी  उपस्थित होते.मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मराठवाडा रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (कला), प्रल्हाद गुरव (वैद्यकीय), दीपक नागरगोजे (सामाजिक), प्रभाकर निलेगावकर (नाट्य), श्रीकांत जाधव (बँकिंग), अमित माने (कृषी), राजेंद्र हुंजे (पत्रकारिता) आणि स्वराज सरकटे (गायन) यांचा गौरव केला. चौधरी म्हणाले की, मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यामध्ये सरदार पटेल यांचे जेवढे श्रेय आहे तेवढेच श्रेय पंडित नेहरू यांचे देखील आहे, कारण हा समूहिक मंत्रिमंडळाचा निर्णय होता.   मराठवाड्यातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. मराठवाड्यात माती आणि माणुस दुभंगल्या जात आहे. जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात दिसून येत आहे. मराठवाड्यातील अनेक मंडळी आज उत्तम प्रकारे सर्वच क्षेत्रात काम करुन  समाज सेवा देखील करत आहेत. दिलीप देशमुख म्हणाले, मराठवाड़ा मुक्ति संग्राम हा हैदराबाद मुक्ति संग्राम नावाने ओळखला जातो. संघर्ष हाच मराठवाडयाच्या पाचविला पूजलेला आहे. ह्या संघषार्तूनच मराठवाड्यातील माणूस तयार प प्रत्येक क्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील परिस्तिथी सवार्ना माहिती असून अतिशय प्रतिकूल परिस्तिथीमुळे इथला तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेत आहे. त्यामुळे हा संघर्ष इथेच थांबवू नका आज मराठवाड्याची जी परिस्तिथि आहे, जे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणखी संघर्ष करायचा आहे. त्यामुळे आपल्या नोकरी, व्यवसायात स्थिर राहून मराठवाड्यासाठी काही करता येईल का ? याबाबतीत विचार करणे गरजेचे आहे. आपले गाव, तालुका, जिल्ह्यासाठी काही करता येईल का याचा विचार देखील केला पाहिजे..............मुक्त झाल्याचे काही लोकांना आवडले नाहीयोगीराज महाराज गोसावी म्हणाले, मराठवाडा निजामाच्या हुकूमशाहीतुन मुक्त झाला, हे काही लोकांना आवडल नाही. म्हणून काही लोक मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. मराठवाड्यातील नागरिकांची भारतात राहण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्वांची लढा दिला.

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाSanatan Sansthaसनातन संस्था