चौफुला येथील दिव्यांग शिबिरात १२५ दिव्यांगाची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:29+5:302021-07-14T04:14:29+5:30
भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, माजी ...

चौफुला येथील दिव्यांग शिबिरात १२५ दिव्यांगाची नोंदणी
भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार रंजना कुल, नंदू पवार, कांचन कुल, नामदेव बारवकर, मल्हारी गडधे, विकास शेलार, नीळकंठ शितोळे, तुकाराम ताकवणे, लक्ष्मण रांधवण, डॅा. मधुकर आव्हाड आदी उपस्थित होते. कुल म्हणाले, ८० टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असणा-या पात्र व्यक्तीस मोटराईज तीन चाकी सायकल मोफत देण्यात येणार आहे. १०२ दिव्यांग सायकलसाठी पात्र ठरतील. शिबिरात न आलेले पण पात्र असणा-या दिव्यांगांना सायकल देण्यात येतील.
गोपीचंद पडळकर म्हणाले, कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. काळजी घेण्याची गरज आहे. कानपूर अपंग निगमचे डॅा. गिरीश सोळंकी, राज्याचे अपंग विभागाचे सल्लागार विष्णू वैरागर व गजानन म्हस्के यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी डॅा. दीपक जाधव, डॅा. संदीप देशमुख, सोमनाथ गडधे, संतोष कचरे, अशोक दिवेकर यांनी शिबिराचे संयोजन केले. सूत्रसंचालन दिनेश गडधे यांनी केले.
दिव्यांग शिबिरात तपासणीसाठी जमलेले दिव्यांग बांधवाची विचारपूस करताना कांचन कुल.