शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सर्दी फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्यांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:33 AM

महापालिकेने सर्दी, फ्ल्यूसदृश्य लक्षणे तसेच दमा व सारी या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे खाजगी क्लिनिक/ डिस्पेन्सरीला आदेश         

पुणे : कोरोनाची सौम्य लक्षणे असतानाच, संबंधितांना वेळीच उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करणे़ या उद्देशाने महापालिकेने आता शहरातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी येथे सर्दी, फ्ल्यूसदृश्य लक्षणे तसेच दमा व सारी या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता शहरातील सुमारे साडेतीन हजार खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी यांना सदर माहिती देण्याबाबतचे आदेश दिले आहेत.         महापालिकेच्या आरोग्य विभा गाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़मनिषा नाईक यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील खाजगी क्लिनिकमध्ये दररोज शेकडो नागरिक सर्दी, खोकला, ताप आल्यास तपासणीसाठी जातात व औषधे घेतात. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व रूग्णांची माहिती महापालिकेने मागविण्याचे ठरविले असून, याबाबतचे आदेश शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी काढण्यात आले आहेत. यापुढे सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरीमध्ये कोरोनासदृश्य वरील लक्षणे असलेल्या रूग्णांची माहिती संबंधित आस्थापना अथवा डॉक्टरांना ठेवावी लागणार आहे. तसेच ती दैंनदिन स्वरूपात संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ईमेलव्दारे कळवावी लागणार आहे. यात रूग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, आजाराचा प्रकार, ऑक्सिजनची पातळी व अन्य आजार ही माहिती नमूद करणे जरूरी आहे.         दरम्यान, कोरोनासदृश्य आजार असलेल्या रूग्णांची माहिती संकलित करण्यासाठी, सर्व क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक तसेच सर्वेक्षणातील कर्मचारी यांनाही याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या नियंत्रणाखालील कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी येथे वैयक्तिकरित्या जाऊन, सदर माहिती संकलित करण्याबाबत सूचित करावे. तसेच दैनंदिन स्वरूपात संकलित झालेल्या माहितीच्या आधारे संशयित रूग्णांच्याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका