शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

महावितरण पुणे परिमंडलच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत ‘मेकअप’ प्रथम, ‘ओय लेले’ द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:34 IST

महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला.

ठळक मुद्देहेमंत नगरकर यांनी केले होते श्रीरंग गोडबोलेलिखित ‘मेकअप १९८६’ नाटकाचे दिग्दर्शन कोल्हापूर परिमंडलाने सादर केली दीपेश सावंतलिखित ‘ओय लेले’ ही नाट्यकृती

पुणे : महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला. तर, कोल्हापूर परिमंडलाच्या  ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. भरत नाट्य मंदिरामध्ये दोन दिवसीय नाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुणे प्रादेशिक परिमंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुणे परिमंडलाच्या वतीने श्रीरंग गोडबोलेलिखित ‘मेकअप १९८६’ नाटकाचे दिग्दर्शन हेमंत नगरकर यांनी केले होते. तर, अपर्णा माणकीकर, संतोष गहेरवार, विवेक शेळके, सचिन निकम, उदय लाड, प्रदीप मुजुमदार यांनी प्रमुख भूमिका पार पाडल्या. तर बारामती परिमंडलाने रामचंद्र खाटमोडे व विनोद वणवेलिखित गाभारा हे नाटक सादर केले. सरोगेट मदर या विषयावरील भाष्य करून वास्तवाची मांडणी करण्यात आली. श्रीकृष्ण वायदंडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. कोल्हापूर परिमंडलाने दीपेश सावंतलिखित ‘ओय लेले’ ही नाट्यकृती सादर केली. राजेंद्र जाधव यांनी हे नाटक दिग्दर्शित केले होते. ‘आॅनलाईन खरेदी व विक्री’च्या वेडातून थेट नातेसंबंधांचा व्यवहार अन् त्यातील अगतिकता या विषयावर भाष्य करण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे (पुणे), नागनाथ इरवाडकर (बारामती) व किशोर परदेशी (कोल्हापूर) यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर परीक्षक मेधा गोखले, भालचंद्र पानसे, दिलीप जोगळेकर तसेच अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर व राजेंद्र पवार, हेमंत नगरकर यांची उपस्थिती होती. विकास निकम यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत नगरकर यांनी आभार मानले.

नाटकांच्या प्रथम व द्वितीय क्रमांकांसोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार हेमंत नगरकर (पुणे) यांना मिळाला. तर, उत्कृष्ट अभिनय (स्त्री) अपर्णा माणकीकर (पुणे), अभिनय (पुरुष) विवेक शेळके (पुणे), नेपथ्य राजीव पुणेकर (पुणे), प्रकाशयोजना सुनील शिंदे (कोल्हापूर), पार्श्वसंगीत स्वप्निल काटकर (कोल्हापूर), वेशभूषा सुप्रिया पुंडले, रंगभूषा शैलजा सानप यांना प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले. तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी संतोष गहेरवार (पुणे), राम चव्हाण (बारामती), प्राजक्ता घाडगे (बारामती) व रेश्मा इंगोले (बारामती) यांची निवड करण्यात आली. बारामती येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुण्याचे ‘मेकअप १९८६’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. महावितरणच्याच कलावंतांनी संगीतरजनीचा कार्यक्रम सादर केला.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर