शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार देऊनही बालकांची वजने वाढेनात, वजनवाढीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:49 IST

बारामती - जुलै महिन्यात बारामती तालुक्यात ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. या बालकांच्या वजनवाढीसाठी बालग्राम विकास योजनेतून ...

बारामती - जुलै महिन्यात बारामती तालुक्यात ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. या बालकांच्या वजनवाढीसाठी बालग्राम विकास योजनेतून मागील तीन महिन्यांपासून अतिरिक्त पोषक आहार देण्यात येत आहे. सध्या ६६ बालकांपैकी १० बालके सामान्य वजनाची झाली आहेत, तर ४२ बालके मध्यम श्रेणीमध्ये आली आहेत. १४ बालकांचे वजन वाढले आहे. परंतु त्यांचा श्रेणीबदल झाला नाही. पुढील एक-दोन महिन्यांमध्ये उर्वरित बालकांचेदेखील वजन वाढेल, अशी माहिती बालविकास प्रकल्पाधिकारी मिथुनमकुमार नागमवाड यांनी दिली.तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वात जास्त १५ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. बालग्राम विकास योजनेतून बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येत आहे. त्याद्वारे या बालकांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम बारामती तालुक्यामध्ये महिला व बालकल्याण विभागांतर्गत बालग्राम विकास योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली होती. यादरम्यान जिल्ह्यात कुपोषणाच्याबाबतीत बारामती तालुक्याचा दुसरा क्रमांक लागल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीचाबालकल्याण विभाग तीव्र कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. बारामती तालुक्यात अंगणवाडीतील कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त आहारसंहिता व औषधसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून बारामती तालुक्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येत आहे.बारामती तालुक्यातील ४१६ अंगणवाड्यांत जून महिन्यात अंगणवाडीसेविका व पर्यवेक्षिका यांनी केलेल्या सर्वेक्षणात उंचीनुसार तीव्र कमी वजनाची व बुटकी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. बारामती तालुक्यात प्रकल्प एकच्या विभागात ५० कमी वजनाची बालके आहेत. प्रकल्प दोनमध्ये १६ बालके अशी एकूण ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळून आली होती.या बालकांना अंगणवाडीतच सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर दोन तासाला वेगवेगळ्या पद्धतीने अतिरिक्त आहार देण्यात येत आहे. कमी वजनाच्या बालकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे, प्रोटिन कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ वजनवाढीसाठी दिले जात आहेत. त्याचबरोबर आहारात अमायलेजयुक्त पिठाची लापशी, रवा, उपमा, खीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, उकडलेला बटाटा, अंडी, फळे, गूळ-शेंगदाणे,खजूर, राजगीरा लाडू, अंगणवाडीतील दोन वेळेतील आहार व घरचा आहार अशा पद्धतीने दिवसभरात बालकांना अतिरिक्त आहार दिला जात आहे. या बालकांना सुदृढ करण्यासाठी बालविकास प्रकल्प विभाग मेहनत घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे