शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

हडपसरच्या पाण्यात कपात, हिवाळ्यामध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 4:35 AM

उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना

हडपसर : उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ ७६ एमएलडी पाणी मिळत आहे. परिणामी, कमीदाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.रामटेकडीवरील पाण्याची टाकी वारंवार शून्यपातळीला जाते. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून अधिकचे पाणी पंपिंग करून, या टाकीत पाणी भरणे गरजेचे आहे.याबाबत हडपसर, कोंढवा, मुंढवा आणि वानवडी भागांतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाºयांना सर्वेक्षण करून, दोन दिवसांत हडपसर विभागास पूर्ववत व नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश अधिकाºयांना दिला.याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जगताप, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, योगेश ससाणे, चंचला कोद्रे, रुक्साना इनामदार, हमिदा सुंडके, परवीन शेख, माजी नगरसेवक सुनील बनकर आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. या बैठकीसाठी लष्कर पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते.आठ दिवस पाणीपुरवठा नाही1 हडपसर परिसरातील हिंगणेआळी, मगरआळी, रामेशीआळी, पांढरेमळा, गरडूवस्ती, अल्हाटवस्ती, काळेपडळ या भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हडपसर गावठाण, गाडीतळ, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, आकाशवाणी, गाडीतळ या भागात पूर्वी दोन तास पाणी येत होते. सध्या केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याची वेळ अनियमित असते.2 परिणामी, काही भागात नगरसेवकांकडून टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, पैसे देऊनही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रामटेकडीवर नव्याने बांधण्यात आलेली ८० लाख लिटर पाण्याची टाकी वापराविना पडून आहे. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र हे १०० एमएलडीचे असून, त्याची मुदत संपली आहे. दुरवस्था झाल्याने ते कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे.3 लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले की, लष्कर पाणीपुरवठा ते रामटेकडी टाकीदरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यास सात महिने लागतील.पाणीपुरवठा सुरळीत न होण्याची कारणे :पर्वती येथून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी येते. नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे. शहरातील काही भागांत चोवीस तास पाणीपुरवठा होतो.रामटेकडी येथील पाण्याच्या टाक्याची पातळी वारंवार शून्य होते. रामटेकडीवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणी सोडण्याची आवश्यकता.दाब कमी असल्याने उंच भागातील नळांना पाणी येत नाही.

टॅग्स :Puneपुणे