गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून महिला दिनाची भेट द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:10+5:302021-03-07T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचे दर भडकले असून त्यामुळे धुणी-भांडी, स्वयंपाक करणा-या घरेलू महिला कामगारांना तुटपुंज्या ...

गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून महिला दिनाची भेट द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचे दर भडकले असून त्यामुळे धुणी-भांडी, स्वयंपाक करणा-या घरेलू महिला कामगारांना तुटपुंज्या पगारात घर कसं चालवाव, याची विवंचना पडली आहे. किमान ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून कष्टकरी महिलांना महिला दिनाची भेट द्यावी, अशी मागणी घरेलू कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पंडित यांनी केली आहे.
लॉकडाऊनपासून सामान्य घरेलू कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात गॅस दरवाढीमुळे कामगार वर्ग भरडला जात आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींनी घरेलू महिला कामगार हैराण झाले असून गॅस सिलिंडरच्या दर कमी न केल्यावर संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा पंडित यांनी दिला आहे.