ओळखपत्र मिळालेल्यांसाठीच पुण्यातील लष्करभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:42+5:302021-01-13T04:25:42+5:30

कोरोना काळात महिलांसाठी लष्करात भरतीसाठी www. joinindianarmy. nic.in. संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना असल्यामुळे ही भरती प्रक्रिया लष्कराला ...

Recruitment in Pune only for those who have received identity cards | ओळखपत्र मिळालेल्यांसाठीच पुण्यातील लष्करभरती

ओळखपत्र मिळालेल्यांसाठीच पुण्यातील लष्करभरती

कोरोना काळात महिलांसाठी लष्करात भरतीसाठी www. joinindianarmy. nic.in. संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना असल्यामुळे ही भरती प्रक्रिया लष्कराला राबविता आली नव्हती. दरम्यान या भरती बाबत काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे अनेकांचे या भरती प्रकियेबाबत संभ्रम झाले होते. यामुळे भरती स्तळावर संभाव्य होणारी गर्दी टाळण्यासाठी लष्करातर्फे रविवारी पुन्हा पत्रक काढण्यात आले.

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील युवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देश्याने ही भरती घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर ओळखपत्र पाठवण्यात आले आहे. यामुळे ज्यांना हे ओळख पत्र मिळाले आहे त्यांनीच भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करून भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लष्करी पोलीस दलात दाखल करून घेणार आहे.

Web Title: Recruitment in Pune only for those who have received identity cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.