वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५९५ पदांच्या भरती प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:53+5:302020-12-08T04:10:53+5:30
पुणे : पुणे महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया''''''''करिता नव्याने ५९५ पदे भरण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कार्यवाही ...

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५९५ पदांच्या भरती प्रक्रिया सुरू
पुणे : पुणे महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया''''''''करिता नव्याने ५९५ पदे भरण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
महाविद्यालयाच्या ( मेडिकल कॉलेजच्या) ''''''''डीन'''''''' पासून प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोप्रेसरसह आदी शिक्षक वर्ग ते महाविद्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी अशी तब्बल ५९५ पदे महापालिकेकडून भरण्यात येणार आहे. या पदाची ''''''''बिंदू नियमावली'''''''' करण्याचे काम सध्या सुरू असून, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया जानेवारी,२०२१ पासून सुरू होणार आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्यावतीने सक्षमता प्रमाणपत्र दिल्यानंतर महाविद्यालय उभारणीच्या कामाने मोठी गती घेतली आहे. यात प्राधान्याने सणस शाळेतील महाविद्यालयाकरिताच्या वर्ग खोल्या उभारणीचे काम व कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नंबर ऑफ बेड म्हणजे, प्रत्येक विषयास अनुसरून बेड सज्ज करण्याचे अंतिम टप्प्यातील काम आजमितीला सुरू झाले आहे.
दरम्यान केंद्र शासनाचे '''''''' नॅशनल मेडिकल कमिशन'''''''' चे पथक येत्या जानेवारीच्या मध्यात महाविद्यालयाच्या पाहणीसाठी येणार असून, ही पाहणी महाविद्यालय उभारणीतील शेवटची प्रक्रिया राहणार आहे.