शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील रिक्त जागांसाठी मोठी नोकरभरती; जाणून घ्या कधीपासून होणार भरती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:04 IST

३४७ रिक्त जागांसह आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आदी विभागांमधील रिक्त पदे भरणार...

पुणे : महापालिकेच्या विविध खात्यांमधील कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) च्या ३४७ रिक्त जागांसह आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आदी विभागांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.

ही भरतीप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, यामध्ये नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ५ अग्निशमन केंद्रांमध्ये २०० फायरमन कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे़त, तर आरोग्य विभागातील भरती करताना, कोरोनाकाळात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासकपदी नियुक्त झाल्यावर दुसरी स्थायी समितीची बैठक मंगळवारी संपन्न झाली़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली़ बैठकीमध्ये महापालिकेने उभारलेली तीन रुग्णालये ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याकरिता लवकरच निविदा काढून खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत़

३१ मार्चपर्यंत सर्व देयके अदा करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला होता़ त्यानुसार आत्तापर्यंत ४ हजार ३०० कोटी रुपयांची देयके दिली गेली आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे. परंतु, वर्षाअखेर किती शिल्लक राहते त्यानुसारच हा फरक कधी व किती टप्प्यात द्यायचा याचा निर्णय होईल, असे कुमार यांनी सांगितले.

जायका प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याबाबत नियोजन

जायका प्रकल्प दोन वर्षांत म्हणजेच मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाचे ठेकेदार, सल्लागार व पालिकेच्या अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली़ यामध्ये पुढील तीन महिन्यांत जायका प्रकल्प अंमलबजावणीचा आराखडा तयार करून तो तीनऐवजी दोन वर्षांत पूर्ण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpale guravपिंपळेगुरव