शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:47 IST

महापरीक्षा पोर्टल च्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती.

ठळक मुद्देअर्जपत्रित पदांच्या भरतीबाबत निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा मनविसेकडून प्रयत्न

पुणे : महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती. यामुळे राज्यातील तरुण अस्वस्थ होते. म्हणूनच याबाबत राज्यसरकारकडे वारंवार पाठपुरावा मनविसेकडून करण्यात येत होता. अराजपत्रित पदांमध्ये, पोलीस भरती, शिक्षक सेवक भरती, अंगणवाडी सेवक, तलाठी, कनिष्ठ लिपिक इत्यादी पदांच्या भरतीबाबत गेल्या पाच महिन्यात निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनविसेकडून करण्यात आला.अखेर राज्यातील तरुणांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या सरळ सेवा पद भरतीबाबत सोमवारी(दि. १७) राज्य सरकारने शासन निर्णय करून स्पष्टता दिली.    राज्यातील तरुणांच्या प्रचंड प्रतिक्षित असणारी सरळ सेवा पद भरतीबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण आयुक्त, महा आयटीचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. सोमवारी राज्य सरकारने  ही भरती 'महाआयटी' कडून कंपनी निवड करून, निवड समितीच्या नियंत्रणात होणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.      याबाबत कल्पेश यादव यांनी सांगितले, सरळ सेवा पदभरतीसाठी चालू असणारी कंपनी नेमणूक प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे व याच पद्धतीने तिथे ही यश येईल अशी आशा आहे. विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणे किंवा याचिका दाखल करणे यामुळे फक्त प्रशासन वेठीस धरले जाते आणि प्रश्न तसेच राहतात, त्यामुळे असे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तरच विद्यार्थ्यांचे हित जोपासता येईल, सामान्य प्रशासन विभागाच्या आजच्या शासन निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारMNSमनसे