शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पुणे जिल्ह्यात ९०० पोलीस शिपायांची होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 18:23 IST

पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य ९०० पोलीस शिपाई निवृत्त होणार आहे़.

ठळक मुद्देयंदापासून काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणारराज्य राखीव पोलीस दलासाठी १०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार

पुणे : पोलीस शिपाई भरतीचा कार्यक्रम गृह विभागाने जाहीर केला असून, या वर्षभरात रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़. त्यानुसार पुणे जिल्ह्यात ९०० पदांसाठी भरती केली जाणार असून, राज्य राखीव पोलीस दलासाठी १०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे़. पोलीस भरतीमध्ये यंदापासून काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़. लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १:५ या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे़. त्यामुळे चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी राहणार आहे़. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य ९०० पोलीस शिपाई निवृत्त होणार आहे़. या रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे़. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या गट १, २ आणि दौंड येथील गट ५ व ७ मधील जवळपास १०० पदे रिक्त होणार आहेत़. यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या पुणे विभागामार्फत भरती प्रकिया राबविली जाणार आहे़ . 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस