आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख

By Admin | Updated: May 21, 2015 01:48 IST2015-05-21T01:48:29+5:302015-05-21T01:48:29+5:30

पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रत्यक्ष करून देत असल्याचा भास होतो आणि या अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून साधलेली किमया मनाला थक्क करते.

Recognition of miracles and music | आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख

आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख

पुणे : शास्त्रीय गायन, सनई, सतार, सरोद, बासरी यांतून संगीताचे सूर आळवत संगीतप्रेमींच्या मनाला गवसणी घालणाऱ्या दिग्गज कलाकारांची ओळख पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रत्यक्ष करून देत असल्याचा भास होतो आणि या अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून साधलेली किमया मनाला थक्क करते.
या गोष्टी अनुभवायला येतात त्या सहकारनगर परिसरातील वसंतराव बागुल उद्यानात पंडित भीमसेन जोशी कलादालनात साकारलेल्या ‘कलाकारों की कहानी संगीतकारों की जुबानी’ या उपक्रमात! छोट्यांसाठी हा माहिती आणि आनंदाचा मोठा खजिनाच यातून उपलब्ध होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगीतविश्वाची माहिती करून कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. कलादालनात प्रवेश करताच ए. आर. रेहमान यांच्या हुबेहूब प्रतिमेने आपले स्वागत होते.
शास्त्रीय गायन, सनई, तबला, सतार, सरोद, बासरी यांतून संगीताचे सूर आळवत कार्यक्रमाची सुरुवात होते. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, सतारवादक पं. रविशंकर, सनईवादक पं. बिस्मिल्ला खॉँ, तबलावादक उस्ताद अहमदजान थिरकवा खॉँ यांची ओळख पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या आवाजात ऐकायला मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेली ही किमया थक्क करते. याकरिता शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरासिया यांनी सहकार्य केले असून, त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.(प्रतिनिधी)

४संगीताचा कार्यक्रम श्रवण केल्यानंतर आरशांचा भुलभुलैया हे दालन वेगळ्याच विश्वात नेऊन सोडते.
४ तिथे आतमध्ये गेल्यानंतर आरशामध्ये आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो; पण पूर्णपणे गोंधळून जातो.
४पडदा हालला की आपल्याला जाणवते की आपण पिंजऱ्यात उभे आहोत. रंगीबेरंगी लाईट इफेक्टमुळे वेगळा अनुभव मिळतो.

दरीवरील हलणारा पूल, खोल दरी, अचानक अंगावर येणारा डायनासॉर, काळी गुंफा, खुनी दरिंदा, घाबरविणारे ध्वनी आदींचा अनुभव मिळतो. संकटांना न घाबरता त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण स्वत: रस्ता शोधला पाहिजे. धैर्य, जिद्द, कल्पकता व आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण झाला पाहिजे, अशी या दालनाची निर्मिती करण्यामागची संकल्पना आहे.- आबा बागुल, उपमहापौर

Web Title: Recognition of miracles and music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.