वाढत्या इच्छुकांमुळे भाजपमध्ये बंडाचे वारे

By Admin | Updated: August 5, 2014 23:13 IST2014-08-05T23:13:28+5:302014-08-05T23:13:28+5:30

लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेवर स्वार होऊन मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.

The rebellion in the BJP due to rising inclinations | वाढत्या इच्छुकांमुळे भाजपमध्ये बंडाचे वारे

वाढत्या इच्छुकांमुळे भाजपमध्ये बंडाचे वारे

पुणो : लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेवर स्वार होऊन मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शहरातील भाजपच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात तसेच सर्वच मतदारसंघांमधून बंडाचा सूर आहे. 
शहर व जिल्हय़ातील 8 विधानसभा मतदारसंघांमधून विद्यमान आणि काही माजी आमदारांसह 84 जणांनी उमेदवारी मागितली आहे.  ग्रामीण भागातील मतदारसंघांमधून उमेदवारी मागणा:यांची संख्या अधिक आहे. शहरातील 5 मतदारसंघांमधून 3क् तर ग्रामीण भागातील 3 मतदारसंघांमधून 54 जण इच्छुक आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर आणि हरिभाऊ बागडे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 
शिरूरमधून सर्वाधिक 18, मावळमधून 16, दौंडमधून 14 जण इच्छुक आहेत. 
शहरातील मतदारसंघांपैकी शिवाजीनगरमधून 15 जणांनी उमेदवारी मागितली आहे. कसबा व ¨पंपरी मतदारसंघातून प्रत्येकी 6 तर पर्वतीमधून 5 आणि खडकवासला मतदारसंघातून 4 जणांनी उमेदवारी मागितली आहे.  
8 ते 1क् महिला उमेदवारांचा समावेश एकूण इच्छुकांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी 
अन्य पक्षांमधून आलेल्यांचाही त्यात समावेश आहे, असे बागडे 
यांनी सांगितले. या मतदारसंघांशिवाय कँटोन्मेंट मतदारसंघातूनही 
उमेदवारी मागण्यात आली आहे, 
असे फुंडकर आणि बागडे यांनी सांगितले. 
लोकसभेच्या निवडणुकीत एकटय़ाच्या बळावर प्रचंड बहुमत पक्षाला मिळाल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरून आलेल्यांची संख्या वाढत आहे, असे  बागडे यांनी सांगितले.  (वार्ताहर)
 
4महायुतीमधील घटक पक्षांना जागा वाटपाचा निर्णय प्रदेश भाजपकडून होईल. कोणत्या जागा सोडाव्यात याबद्दल निर्णय झालेला नाही. कँटोन्मेंटची जागा भाजपला सुटली तर ती निवडून आणू असे कार्यकत्र्याचे म्हणणो आहे, असे सांगून बागडे यांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास नकार दिला.
 
पहिली यादी 15 ऑगस्टर्पयत 
4पहिली यादी 15 ऑगस्टर्पयत देण्याचा प्रयत्न राहणार आहे. 9 ऑगस्टला दिल्ली येथे पक्षाची राष्ट्रीय परिषद असून, त्या दरम्मान मतैक्य झाले तर 15 ऑगस्टपूर्वी सुद्धा यादी जाहीर होऊ शकेल, असे बागडे यांनी सांगितले.

 

Web Title: The rebellion in the BJP due to rising inclinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.