नाले वळविण्यास बसणार लगाम

By Admin | Updated: May 23, 2014 04:51 IST2014-05-23T04:51:30+5:302014-05-23T04:51:30+5:30

अनधिकृत बांधकामांसाठी मनमानी पद्धतीने नाले वळविण्यास आता लगाम बसणार आहे.

Rebel to sit | नाले वळविण्यास बसणार लगाम

नाले वळविण्यास बसणार लगाम

पुणे : अनधिकृत बांधकामांसाठी मनमानी पद्धतीने नाले वळविण्यास आता लगाम बसणार आहे. शहरातील नाल्यांच्या सध्याच्या स्थितीसंदर्भात प्रायमुव्ह संस्थेने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अंतिम असल्याने यापुढे खासगी जागा मालकांना नाला वळविण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या नियंत्रण नियमावलीतील ११ (ब)ची असलेली तरतूद रद्द करण्यात यावी, तसेच जुन्या व नवीन हद्दीच्या विकास आराखड्यात अहवालाचा अंतर्भाव करावा, या प्रस्तावास नुकतीच मुख्य सभेत मान्यता देण्यात आली. नगरसेवक अजय तायडे आणि प्रकाश ढोरे यांनी शहर सुधारणा समितीत ठेवलेल्या या प्रस्तावास समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्य सभेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील नाल्यांसंदर्भातील सद्य:स्थितीचा अहवाल प्रायमुव्ह संस्थेने तयार केला असून महापालिका प्रशासनाने स्वीकारला आहे. मात्र, हा अहवाल अंतिम करण्यापूर्वी शहरातील नाल्यांची दिशा बदलण्याचे अधिकार विकास नियंत्रण नियमावलीमधील ११ (ब)नुसार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून जागा मालकांच्या मागणीनुसार, अनेक ठिकाणी नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरजन्य स्थितीही निर्माण झालेली आहे. हे प्रकार भविष्यात रोखण्यासाठी नाल्यात बदल करण्यासाठी असलेली तरतूद रद्द करण्याचे ठरावात नमूद करण्यात आले होते. तसेच, या रद्द झालेल्या तरतुदीत बदल करून ३७ (१) च्या कारवाईनुसार, प्रायमुव्हचा अहवाल जुन्या आणि नवीन विकास आराखड्यात समाविष्ट करावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. शहरात पाच प्रमुख नाले असून, सुमारे १५०च्या वर छोटे-मोठे नाले आहेत. दरम्यान, हा अहवाल विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची कारवाई पूर्ण करेपर्यंत नाला बदलांच्या प्रस्तावास स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rebel to sit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.