शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य करण्यास नकार दिल्याचे कारण : कोथरूडमध्ये दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:26 IST

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचायला नकार दिल्यामुळे चौघांनी युवकाला कोयत्याने व लाकडी बांबूने मारहाण करण्याचा प्रकार घडला.

कोथरूड : गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचायला नकार दिल्यामुळे चौघांनी युवकाला कोयत्याने व लाकडी बांबूने मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्याचाच राग मनात धरून या युवकाने चौघांसह एका महिलेच्या हातावर हातोडी मारून टेम्पोची काच फोडली. कोथरूड येथील राऊतवाडी वस्ती येथील बालाजी चौकात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. कौस्तुभ शिंदे (वय १९, रा. केळेवाडी, कोथरूड) याने दिलेल्या तक्रारीवरून योगेश जगताप, बल्ली, गोप्या, सोन्या (पूर्ण नावे पत्ता माहित नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सुरेश वाजे (वय १९, रा. राऊतवाडी, कोथरूड) याने दिलेल्या तक्रारीवरून विशाल गोणते, कौस्तुभ शिंदे, गणेश राठोड आणि आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजे हा मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास शिंदे यांच्या बालाजी मित्र मंडळापासून जात होता. त्यावेळी वाजे याच्या मंडळाची मिरवणूक सुरू होती.भांडणे सुरू असताना शिंदे याच्या आईने मध्यस्थी करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बल्ली याने शिंदेच्या पायावर कोयत्याने मारले तर, जगतापने शिंदेच्या आईच्या हातावर हातोडा मारला. त्यानंतर गोप्याआणि सोन्याने मिरवणुकीसाठी लावलेल्या जनरेटरच्या टेम्पोची काच बांबूने फोडली आणि पळून गेले. कोथरूड पोलीस पुढील तपासकरत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे