शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे वारजे पुलावरून कोसळली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 20:15 IST

प्रशासनाकडून सध्या सुमारे ४५० बसेसच्या तपासणीचे काम सुरू आहे. काही बसेसच्या स्टेअरिंगच्या नटबोल्टला लॉक पिन नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्या सर्व बसेसला ही पिन बसविण्यात आली आहे.

पुणे : वारजे येथे खड्डयात कोसळलेल्या बसचा अपघात एका छोट्याशा लॉक पिनने केल्याचे समोर आले आहे. स्टेअरिंगला असलेल्या नटबोल्टला ही पिन नसल्याने रॉड निसटून अपघात झाला. तसेच त्यानंतर तपासणी करण्यात आलेल्या ठेकेदारांकडील काही बसेसच्या स्टेअरिंगलाही लॉक पिन नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दररोज रस्त्यांवर धोकादायक स्थितीत बस धावत असल्याचे भयाण वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.मुंबई-पुणे महामार्गालगत वारजेकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस खड्यात कोसळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसमधील सुमारे २० प्रवासी जखमी झाले. पण या अपघाताने असुरक्षित बस प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.पीएमपीने ठेकेदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या सुमारे ४५० बस सध्या मार्गावर धावत आहेत. अपघातग्रस्त बसही त्यापैकीच एक होती. त्यामुळे अपघातानंतर पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांकडील सर्व बसेसचे तांत्रिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. भाडेतत्वावरील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.         अपघातानंतर त्याच्या कारणांवरून विविध तर्कवितर्क लढविण्यात आले. बसचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे, स्टेअरिंग रॉड तुटल्याच्या चर्चा रंगल्या. पण पीएमपीतील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष बसची पाहणी केल्यानंतर स्टेअरिंग रॉडला असलेल्या नट-बोल्टला लॉक पिन नसल्याचे समोर आले. सततच्या धडधडीमुळे बोल्ट निघू नये, यासाठी ही पिन बसविली जाते. स्टेअरिंगच्या नटबोल्टही ही पिन नसल्याने बोल्ट हळूहळू ढिला होत जाऊन निघाला. त्यामुळे स्टेअरिंग व मुख्य रॉडला जोडून ठेवणारा नटही पडला. परिणामी चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण गेल्याने बस खड्डयात आदळली. हीच ‘लॉक पिन’ काही बसेसमध्ये नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे दररोज रस्त्यांवरून फिरणाऱ्या अनेक बस नागरिकांसाठी टांगती तलवार ठरत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकAccidentअपघातWarje Malwadiवारजे माळवाडी