शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि  जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले.

ठळक मुद्देप्रदर्शन रविवार २५ मार्च सकाळी १० ते ९ पर्यंत सुरु

पुणे : व्यंगचित्र हा एक आरसा असतो, समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब त्यात पडत असते. व्यंगचित्र याच्या किंवा त्याच्या विरोधात असतात असे समजता कामा नये . सध्याची परिस्थिती पाहता व्यंगचित्रकलेला खरेखुरे  'अच्छे  दिन ' येताना दिसत आहेत ' असे प्रतिपादन प्रसिद्ध व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले.त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, अण्णा थोरात, नगरसेवक  रवींद्र माळवदकर, काका चव्हाण, नगरसेविका अश्विनी कदम, अशोक राठी आदी राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी तसेच व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, घनश्याम देशमुख, चित्रपट निर्माते निलेश नवलखा तसेच मिस गुजरात सिध्दी त्रिवेदी उपस्थित होते.या प्रदर्शनात वैजनाथ दुलंगे, प्रदीप म्हापसेकर,आलोक निरंतर, राजेंद्र सरग , कपिल घोलप, धनराज गरड,अतुल पुरंदरे, शरयू परतांडे, योगेंद्र भगत, संजय मोरे, रणजीत देवकुळे, भटू बागले, गौरव यादव, लहू काळे, यांच्यासह अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत.हे प्रदर्शन रविवार २५ मार्च सकाळी १० ते ९ पर्यंत सुरु राहणार आहे. योगेश कुचेकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीCartoonistव्यंगचित्रकार