पोलिसांच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ
By Admin | Updated: October 2, 2014 23:33 IST2014-10-02T23:33:52+5:302014-10-02T23:33:52+5:30
निवडणूक काळादरम्यान होणा:या प्रचार सभांसाठी लागणा:या मैदानांचा प्रश्न आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांनी पाठ फिरवली.

पोलिसांच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ
>पुणो : निवडणूक काळादरम्यान होणा:या प्रचार सभांसाठी लागणा:या मैदानांचा प्रश्न आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांनी पाठ फिरवली. पुणो शहर पोलिसांनी बोलावलेल्या या बैठकीला केवळ दोनच पक्षांचे चार पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक शांततेत आणि अनुचित प्रकारांशिवाय पार पडावी, याकरीता पोलिसांचे एकतर्फी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या 4 तारखेला पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय पक्षांना प्रचार सभा घेण्यासाठी मैदाने देण्यास मध्यवर्ती भागातील महाविद्यालये आणि शाळांनी नकार दिला होता. नदीपात्र वगळता शहराच्या मध्यवस्तीत शाळा व महाविद्यालयांची मैदाने वगळता मोठी मैदाने नाहीत. यासोबतच पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर सभा घेण्यासाठी मैदानांचा प्रश्न उभा राहणारच आहे. काही पक्षाच्या उमेदवारांनी सभांसाठी शाळा आणि महाविद्यालयांशी बोलणी सुरू केलेली असली, तरीदेखील पोलिसांना त्याबाबत निश्चित काहीच सांगण्यात आलेले नाही. वाहतूक आणि सुरक्षा असे दोन्ही मुद्दे लक्षात घेऊन सभास्थानांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पोलिसांनी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची बैठक बुधवारी आयोजित केली होती. दुपारी चार वाजता होणा:या या बैठकीला पाच वाजेर्पयत कॉँग्रेस आणि मनसेचे जेमतेम चारच पदाधिकारी पोचू शकले. मतदानाचा दिवस जवळ येत चालला असून, प्रचाराला अगदीच कमी वेळ हातामध्ये राहिल्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी अधिकाधिक वेळ प्रचारासाठी देत आहेत. पदयात्र व रॅलींद्वारे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे. प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळेही पदाधिका:यांनी बैठकीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सभांची परवानगी मागण्यासाठी किमान 48 तास आधी पोलिसांना पत्र देणो आवश्यक आहे. परंतु, अद्याप कोणत्याही सभेसाठी परवानगी मागण्यात आलेली नसून, कोणत्याही राजकीय पक्षाने नियोजित सभांची माहितीही दिलेली नसल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रचारसभांसाठीही बंदोबस्त तैनात करताना पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. ऐनवेळी राजकीय पक्षांकडून सभांची तयारी सुरू झाल्यास पोलिसांची धावपळ होणार, हे स्पष्ट आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी पुन्हा येत्या चार तारखेला राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची पोलिसांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तरी राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळतो का, हे पाहणो औत्सुक्याचे ठरणार आहे.