वाचनसंस्कृती सर्वांनी जोपासली पाहिजे
By Admin | Updated: November 16, 2016 02:59 IST2016-11-16T02:59:05+5:302016-11-16T02:59:05+5:30
स्पर्धेच्या युगात शिक्षणानेच समाजाची प्रगती होणार आहे़ ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी वाचनसंस्कृती सर्वांनी जोपासली पाहिजे,

वाचनसंस्कृती सर्वांनी जोपासली पाहिजे
नारायणगाव : स्पर्धेच्या युगात शिक्षणानेच समाजाची प्रगती होणार आहे़ ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी वाचनसंस्कृती सर्वांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन लेखक कवी मनोहर मोहरे यांनी शिरोली (बोरी) येथे केले़
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय शिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक-कवी आपल्या भेटीला या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते हे होते़ या वेळी विद्यालयाचे प्रशिक्षक विलास चासकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वाजगे, सरपंच सुमन खंडागळे, उपसरपंच जयसिंग गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू पोळ, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते़
मोहरे म्हणाले, की २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत डिजिटलची सोय होणे गरजेचे असून, त्यासाठी शिक्षणप्रेमी, दानशूर, पालक, ग्रामस्थ यांचे योगदान महत्त्वाचे आहे़ शिक्षणाने माणूस घडतो़ भारतीय संस्कृती महान आहे़ त्यासाठी प्राथमिक शिक्षण हा त्याचा पाया आहे़