शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या नामांतराची मागणी : राजकीय पक्षांच्या सावध तर पुणेकरांच्या पुणेरी प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 08:10 IST

संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे.

पुणे : संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे पुणेकरांनी मात्र खास 'पुणेरी' शैलीत आपली मते नोंदवली आहेत. 

       संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नाव बदलून ते जिजापूर करावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही  निवेदनाची प्रत पाठवली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, हे नाव कोणत्याही धार्मिक आकसापोटी नाही तर जिजामातांच्या आदराप्रती बदलावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सध्या देशात सुरु असलेल्या कोणत्याही घटनेशी संबंधित नसून गेली पंधरा वर्षे मराठा सेवा महासंघ ही मागणी करत आहे. 

            पुण्यातील सध्याचे सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या विषयावर लगेच प्रतिक्रिया देऊ नये असे वाटत असल्याचे सांगितले. सध्या भूमिका घेणे योग्य नसून माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी मात्र ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत सरकारनेच निर्णय घ्यावा असे मत व्यक्त करत पुन्हा भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला आहे.ब्राहमण महासंघाचे आनंद दवे यांनी नाव बदलण्यापेक्षा जिजाऊंचे योगदान बघून त्यांचे स्मारक करण्यात यावे असे मत व्यक्त केले. 

              राजकीय पक्षांची भूमिका अद्यापतरी स्पष्ट नसताना आमदार अनंत गाडगीळ यांनी मात्र नामांतराला विरोध केला आहे. ते म्हणाले की, पुण्याचे नाव बदलून इतिहास बदलला जाणार आहे का? त्यापेक्षा जिजाऊंच्या नावाने एखादी संस्था सुरु करावी. नाव बदलण्याचा उद्देश चांगला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला न्याय मिळणार असेल तर हरकत नाही.मात्र, समाजात जाती, धर्माचे विभाजन होत असेल तर नाव बदलण्यात येऊ नये. डॉ सतीश देसाई म्हणाले की, पुण्याचे पुणेरीपण टिकले पाहिजे. या शहराने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.निवडणुका आल्या की अशा गोष्टी सुचतात. पुणेकरांच्या श्वासात पुणे आहे ते बदलता येणार नाही.

              लेखक मिलिंद शिंत्रे म्हणाले की, जिजाऊ माँसाहेबांविषयी आदर आहेच. त्यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यात असून तिथे नामांतर करणे अधिक संयुक्तिक ठरेल. परकीय शत्रूंनी आक्रमण केलेली नावे बदलणे समजू शकतो मात्र पुणे या परिघात बसत नाही. सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ म्हणाले की, पुणे या नावाला शौर्याचा, त्यागाचा, क्रांतिकारकांचा इतिहास आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याची  आवश्यकता वाटत नाही. ढोल ताशा संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले की, नाव बदलून इतिहास बदलत नाही. डेक्कनचे नाव संभाजीनगर केले आहे. मात्र तरीही त्याला डेक्कन म्हणूनच ओळखले आणि संबोधले जाते. पुणे या नावाला जाज्वल्य इतिहास आहे. तो बदलण्याचा अट्टाहास करणे चुकीचे आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडBJPभाजपा