शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Positive Story: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 'रिव्हर्सल ऑपरेशन'ने पुन्हा मातृत्व, माहितीसाठी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:13 IST

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो....

- प्रकाश गायकर

पिंपरी : 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यामुळे दोन किंवा एक मूल झाल्यानंतर अनेकजण कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतात. अशा सुखी कुटुंबातील मूल काही कारणांनी मृत झाल्यास कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र, महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असतानाही 'फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी ने पुन्हा मुलाला जन्माला घालता येते, या सर्जरीकडे महिलांचा कल वाढला आहे.

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो. त्यात आजारपण, अपघात, सर्पदंश अशा कारणांचा समावेश असतो. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो. मात्र, आता अशा घटनानंतर फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी करून मुलाला जन्म देण्याकडे दाम्पत्यांचा कल वाढला आहे.

शस्त्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला पुन्हा अपत्य हवे असेल तर 'ट्यूबल रिकॅनलायजेशन किंवा फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी केली जाते. मात्र, अनेकांना याविषयी माहिती नसते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये फैलोपियन ट्यूब कापली जाते. मात्र या प्रक्रियेत ती पुन्हा जोडली जाते. त्यामुळे पुन्हा गर्भधारणा होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.

'सक्सेस रेट' चांगला

शहरामध्ये वर्षभरात १५ ते २० या शस्त्रक्रिया होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अपत्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेकजण या शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. त्याचा सक्सेस रेट' ही चांगला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

'रिव्हर्सल ऑपरेशन' कधी?

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याने मूल गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मूल हवे असल्यास.

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या पतीचा मृत्यू अथवा घटस्फोट झाल्यावर त्या महिलेला पुन्हा विवाह करायचा असल्यास.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरीचा पर्याय आहे. अद्याप याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. अनेकांना ही अशी शस्त्रक्रिया करून पुन्हा मुलाला जन्म देता येतो, याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपत्य गमावल्यानंतर अनेकजण शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, मुलाला काळाने हिरावून घेतलेल्या महिलांना यामुळे पुन्हा मातृत्व मिळते.

- डॉ. शिवाजी ढगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय,

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे