शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने रिक्षाचालकाचा जीव वाचवण्यासाठी केले प्रयत्न...... चालकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 12:41 IST

दोन दिवसात रिक्षाचालकाची मालवली प्राणज्योत

ठळक मुद्देआशेचे पंख लावून बसलेल्या रवीची मात्र निराशा

एका रिक्षाचालकाला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघून रवी धावून गेला. त्या क्षणी सर्व सूत्रे हाती घेऊन त्यांना तातडीने रुग्णालयात जाण्याची सोय केली. त्यांच्यावर सुरु झालेल्या उपचारात पक्षाघात झाल्याचे कळाले. मात्र दोन दिवसात रिक्षाचालकाची प्राणज्योत मालवली. रवीने रिक्षा चालकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण पक्षाघाताने रिक्षाचालकाची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली. 

सोमवार १५ मार्च सकाळी ११ वाजता रवी कामाला जाताना टिळक पुलावर अचानक एका घोळक्यात शेख नावाचे रिक्षाचालक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. श्वास सोडून त्यांच्यामध्ये जिवंत माणसाचे कुठलेही लक्षण जाणवत नव्हते. अशा परिस्थितीत रवीने सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. बघ्यांच्या गर्दीत जमा झालेल्या एका रिक्षा चालकाच्या मदतीने यांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ताबडतोब उपचाराला सुरुवात झाली. रुग्णालयातील डॉक्टर रिक्षा चालकाच्या ओळखीचे निघाले. मदतीसाठी आलेल्या रवी पुन्हा टिळक पुलावर आला. ज्येष्ठ रिक्षा चालकाची रिक्षा लॉक करून चावी परिचितांच्या स्वाधीन केली. आशेचे पंख लावून बसलेल्या रवीची मात्र निराशा झाली. 

कामगार नेते नितीन पवार यांनी केला होता शेख यांचा पाठपुरावा 

नितीन पवार यांनी इतर रिक्षा चालकांच्या माध्यमातून रवीची माहिती मिळवली. रवीशी संपर्क साधून शेख यांच्याबद्दल पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.  रवीने शेख यांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोन दिवस शेख उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाल्याचे कळाले. गुरुवारी त्यांचे निधन झाल्याचे नितीन पवार यांना समजले.  

रवी कदम हा मूळचा मराठवाडयाचा आहे. रोजगारासाठी सहा, सात वर्षांपासून पुण्यात नवी सांगवीला राहत आहे. दररोज सकाळी शनिवार पेठेत ऑफिसला जात असतो. नेहमीप्रमाणे महापालिकेच्या बस स्थानकावर उतरून टिळक पुलावरून ऑफिसला जात असतो. त्यादिवशीही असेच जात असताना ही घटना घडली.

 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकhospitalहॉस्पिटल