रेशनिंग दुकानदारांचा आज बंद
By Admin | Updated: October 13, 2015 00:37 IST2015-10-13T00:37:17+5:302015-10-13T00:37:17+5:30
रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी १२ आॅक्टोबरला रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़

रेशनिंग दुकानदारांचा आज बंद
पुणे : रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी १२ आॅक्टोबरला रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़
जिल्ह्यात पोलीस व पुरवठा विभागाच्या वतीने सध्या सुरू असेलली स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी योग्य आहे, पण दुकानदारांना होणारा त्रास त्वरित थांबवा. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार शासनाने धान्य दुकानदारांना त्याच्या दुकानापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. परंतु पुणे जिल्ह्यात गोदामामधून दुकानदारांनाच धान्य उचलावे लागते. तसेच गॅस सिलिंडरधारकांना शासनाने रॉकेलचा पुरवठा बंद केला आहे. पण अद्यापही अनेक रेशनकार्डवर गॅस सिलिंडर धारक असल्याच्या नोंदी नाहीत. त्यामुळे नक्की कोणत्या लाभार्थ्यांना रॉकेल द्यावे व नाही, असा गोंधळ दुकानदारांचा उडाला आहे.
वेळोवेळी तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशनच्या वतीने धान्य वाटप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतरदेखील मागण्यांचा विचार न केल्यास नोव्हेंबर महिन्याचे धान्य, साखर, डी.डी काढून सर्व दुकानदार शिवाजीनगर येथील गोदाम येथे जमा करतील. त्यानंतर हे धान्य वाटप करण्याची जबाबदारी प्रशासन व शासनाची राहील, असा इशारा देखील फेडरेशनने दिला. (प्रतिनिधी)