ratap hinge
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:06+5:302021-02-05T05:08:06+5:30
- अवसरी बु, :दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे ...

ratap hinge
-
अवसरी बु, :दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी अहवालात दिला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने अचानक भेट देऊन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील वजनकाट्याची तपासणी केली. भरारी पथकाचे प्रमुख पुण्याचे वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक सं .ना. कवरे व वैधमापन जुन्नर विभाग निरीक्षक प्र. रा. बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक कारखान्यातील ऊस वजनकाट्याची तपासणी केली. यावेळी उसाने भरलेले ट्रक व बैलगाड्याच्या वजनांची कसून तपासणी केली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजनकाटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली. या वेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व वाहनचालक आदी हजर होते. ऊस उत्पादकांचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. कारखान्याचे सर्व वजन काटे हे शेतक-यांना त्यांच्या ऊसाच्या वजनाची खात्री करण्यासाठी नेहमी खुले ठेवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वजनाची खात्री करता येते. आजच्या भरारी पथकाच्या तपासणीनंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी व्यक्त केली.