दलित हत्याकांडविरोधात ‘रास्ता रोको’

By Admin | Updated: October 26, 2014 00:23 IST2014-10-26T00:23:03+5:302014-10-26T00:23:03+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील जाधव कुटुंबीयांच्या झालेल्या हत्याकांडा निषेधार्थ भारिप बहुजन महासंघातर्फे वारजे मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

'Rasta Roko' against Dalit massacre | दलित हत्याकांडविरोधात ‘रास्ता रोको’

दलित हत्याकांडविरोधात ‘रास्ता रोको’

वारजे : अहमदनगर जिल्ह्यातील जाधव कुटुंबीयांच्या झालेल्या हत्याकांडा निषेधार्थ भारिप बहुजन महासंघातर्फे वारजे मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून या वेळी वाहतूक अन्यत्न वळविण्यात आली होती.
 पोलिसांनी शीघ्र कृती करून आरोपींना लवकरात लवकर अटक करून जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी अॅड. वैशाली चांदणो यांनी केली. 
आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आंदोलनात उमेश चव्हाण, अजय भालशंकर, सागर फडके, संदीप शिरसट, लक्ष्मण चव्हाण, परमेश्वर कमाणो, बबलू ढगे, संकेत पासलकर, केशव गावडे, कृष्णा ढगे, अनिल गायकवाड, मच्छींद्र गायकवाड, हनुमंत फडके, अविनाश चतुर यांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील व विजय देशमुख यांनी वारजे पोलीस ठाण्यातर्फे बंदोबस्ताचे नेतृत्व केले.  (वार्ताहर)
 
4अॅड. चांदणो व संघटक सचिव अजय भालशंकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. संजय, जयश्री व सुनील जाधव या एकाच कुटुंबातील सदस्यांची अत्यंत निर्घृणपणो त्यांच्या घरच्या समोरच धारदार शस्त्नाने हत्या करण्यात आली होती.  21 तारखेला घडलेल्या या हत्याकांडाचे पुरावे देऊनही पोलीस प्रशासन ठोस कृती करीत नसल्याने महासंघातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. 

 

Web Title: 'Rasta Roko' against Dalit massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.