अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

By Admin | Updated: May 17, 2014 21:50 IST2014-05-17T19:51:56+5:302014-05-17T21:50:57+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Raped by a lover on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या भावाने फिर्याद दिली आहे.
ओमकार प्रविण खडके (वय २१, रा. चिरके कॉलनी, शिवनगर, लोहगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पिडीत मुलगी आणि आरोपी हे एकाच भागामध्ये राहण्यास आहेत. पिडीत मुलीसोबत प्रेमाचे नाटक करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून खडके याने फुस लावून पळवून नेले. या मुलीशी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पिडीत मुलीचा शोध घेऊन तिला पुन्हा घरी आणण्यात आल्यावर विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: Raped by a lover on a minor girl