हात पाय बांधून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:11 IST2020-12-25T04:11:05+5:302020-12-25T04:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हातपाय बांधून गुंगीचे औषध लावून एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार ...

Rape of a young woman with her hands and feet tied | हात पाय बांधून तरुणीवर बलात्कार

हात पाय बांधून तरुणीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हातपाय बांधून गुंगीचे औषध लावून एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

सागर मोहन सातव (वय २८, रा. सातव वस्ती, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आरोपी सागर हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. ही तरुणी साेमवारी रात्रीच्या वेळी सोमनाथनगर येथून रस्त्याने पायी जात होती. यावेळी सागर चारचाकी गाडी घेऊन आला व मी तुझ्यासोबर लग्न करणार आहे. असे म्हणून त्याने तरुणीला गाडीत बसण्याचा आग्रह केला. तरुणीने नकार दिल्याने त्याने विषारी औषधाची बाटली दाखवत जर गाडीत बसली नाही तर जीवाचे बरे वाईट करेल, असे धमकावले. त्यामुळे ही तरुणी गाडीत बसली. त्यानंतर त्याने दोन मित्रांना बोलावले. त्यांनी या तरुणीचे हातपाय बांधून तिच्या नाकाला गुंगीचे औषध लावून अर्धवट बेशुद्ध करुन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार चंदननगर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape of a young woman with her hands and feet tied