शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 15:18 IST

टॅटू काढत असताना त्रास होत असल्यामुळे आरोपीने पेनकिलरचे औषध देण्याच्या बहाण्याने तिला बेशुध्द होण्याची गोळी दिली. आणि ....

ठळक मुद्देपीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लकमेल करत अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आरोपीची पत्नी अर्चना श्रीवास्तव हिच्याविरोधातही गुन्हा दाखल अनेक मित्रांना फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो तसेच मेसेज पाठवून महिलेची बदनामी

पुणे : टॅटू काढण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लकमेल करत अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकास अटक केली आहे. प्रशांत श्रीवास्तव (रा. उंबऱ्या गणपती चौक, धायरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला असून ती मुलीसह धायरी परिसरात राहत आहे. आरोपी श्रीवास्तव याचे धायरी परिसरात मेडिकलचे दुकान आहे. महिला त्याच्या दुकानासमोर कार उभा करत असत. त्यामुळे दोघांची ओळख झाली.   आरोपी प्रशांत मेडिकल चालविण्यासोबत टॅटू आर्टिस्ट म्हणूनही काम करतो. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यास टॅटू काढण्यास सांगितले. सुमारे एक वर्षांपूर्वी ती मेडिकलमध्ये टॅटू काढण्यासाठी गेली होती. तेव्हा टॅटू काढत असताना त्रास होत असल्यामुळे आरोपीने पेनकिलरचे औषध देण्याच्या बहाण्याने तिला बेशुध्द होण्याची गोळी दिली. महिला बेशुध्द झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकाराची त्याने अश्लील व्हिडिओ तयार केत्यानंतर आरोपीने पीडित महिलेस तुझा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. तसेच तिला स्वत:च्या दुकानात, फिर्यादीच्या घरी व लॉजवर नेवून वारंवार अत्याचार केले. आरोपीने काही दिवसापूर्वी तिला भेटायला बोलावून घेतले. मात्र, तिने नकार दिल्यामुळे त्याने चिडून त्याच्या अनेक मित्रांना फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो तसेच मेसेज पाठवून तिची बदनामी केली. दरम्यान, दुसऱ्या महिलेसोबत पतीचे लैंगिक संबंध असल्याची माहिती आरोपीच्या पत्नीला मिळाली. तिनेही फिर्यादीला ब्लॅकमेल करत गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यास भाग पाडले. तसेच पतीविरोधात तक्रार दिल्यास तुझी सुपारी देवून तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीची पत्नी अर्चना श्रीवास्तव हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन खोडदे करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमRapeबलात्कारPoliceपोलिसmedicineऔषधं