दौंडला महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: December 24, 2016 00:10 IST2016-12-24T00:10:49+5:302016-12-24T00:10:49+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील डोंबाळे वांगदरी येथील ३0 वर्षे वयाच्या विवाहित महिलेला हॉटेलमध्ये ७ ते ८ हजार पगाराची नोकरी लावून देतो

Rape of woman in Daund | दौंडला महिलेवर बलात्कार

दौंडला महिलेवर बलात्कार

दौंड : श्रीगोंदा तालुक्यातील डोंबाळे वांगदरी येथील ३0 वर्षे वयाच्या विवाहित महिलेला हॉटेलमध्ये ७ ते ८ हजार पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले़ नंतर दौंड शहरातील दौंड-पाटस रोड येथे एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने दौंड पोलीस स्टेशनला दिली आहे.
पीडित महिला ही पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील आपल्या बहिणीकडून घरखर्चासाठी पैसे आणण्यासाठी श्रीगोंदा येथील छत्रपती कॉलेजवळील रोडला थांबली असता आरोपी गोपीनाथ हिरू दांगडे (वय ६९, रा. गोगल वडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याने नोकरीचे आमिष दाखवून आपल्या मोटारसायकलवर बसवून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील एका लॉजवरील पहिल्या मजल्यावरच्या एका रूममध्ये नेले व आतमधून कडी लावून घेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. नंतर ही महिला आरोपीच्या तावडीतून सुटून लॉजबाहेर घाबरलेल्या अवस्थेत आली. आरोपीने बाहेर येऊन महिलेला धमकी देऊन आपल्या गाडीवर बसवून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढोकराई फाटा येथे सोडले. त्यानंतर पुढे टमटम गाडीने इनामगाव येथे जाऊन महिलेने आपल्या बहीण, मानलेली मावशी व मावसभावास ही माहिती सांगितली व त्यांच्यासह दौंड येथे येऊन दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असल्याची माहिती पीएसआय निलपत्रेवार यांनी दिली. या प्रकरणी आरोपीस अटक झाली आहे.

Web Title: Rape of woman in Daund