शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:16 IST

पूर्वी एकाच कंपनीत सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची फिर्याद एका ३५ वर्षीय महिलेने दिली आहे

नऱ्हे : पूर्वी एकाच कंपनीत सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची फिर्याद एका ३५ वर्षीय महिलेने दिली आहे. याप्रकरणी सुर्जीत चंद्रकांत यादव (वय ३६, रा. तिरुपती अपार्टमेंट, जेएसपीएम कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राहत असलेली फिर्यादी महिला व याप्रकरणी असलेला आरोपी सुर्जीत हे दोघेजण पूर्वी मुंबई येथे एका कंपनीत कामास होते. एकत्र काम करत असल्याने त्यांची तिथे मैत्री झाली.  याच मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाल्याने त्यांच्यात वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण झाले होते.  दरम्यान स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेकडून दहा लाख रुपये घेतले होते. त्यातील तीन लाख पन्नास हजार गूगल पेद्वारे तर उर्वरित रक्कम ही रोखस्वरुपात दिली होती. त्यानंतर सदरची कंपनी बंद पडल्याने आरोपी सुर्जीत हा पुण्यामध्ये नऱ्हे या ठिकाणी रहावयास आला. फिर्यादी महिला पुण्यात आल्यानंतर सुर्जीतकडे दिलेले १० लाख रुपये परत मागितल्याने सुर्जीतने चिडून जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्याच्याच घरी नेवून माझी इच्छा नसताना जबरदस्तीने बलात्कार केली असल्याची फिर्याद महिलेने केली आहे. हा प्रकार १९ जुलै ते २० जुलै दरम्यान नऱ्हे येथे घडल्याने सुर्जीत यादव यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस