शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा खटला २० महिन्यांत निकाली, आरोपीला 10 वर्षे सक्त मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 02:05 IST

दहा वर्षे सक्तमजुरी : पीडित मुलगी १३, तर आरोपी १९ वर्षांचा

पुणे : खटल्याचा निकाल लागण्यास अनेक वर्षे लागत असल्याने व लांबलेल्या व रखडल्या खटल्यामुळे पीडितेची हेळसांड होऊ नये म्हणून अनेकदा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची तक्रारच दिली जात नाही. मात्र अशाच एका प्रकरणाचा केवळ २० महिन्यांत निकाल लागला असून गुन्हेगाराला न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे.

तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला. गांभीर्याची बाब म्हणजे पीडितेवर अत्याचार करणाºया आरोपीचेवय त्या वेळी अवघे १९ होते. गणेश सुभाष धिवार (वय १९, रा. नामदेवनगर, वडगावशेरी) असे शिक्षा देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३ जानेवारी २०१७ रोजी पीडित मुलगी शाळेला जाते म्हणून घराबाहेर पडली. मात्र सायंकाळी घरी आलीच नाही, म्हणून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून दोघांना दौड येथील नाथाची वाडी येथून ताब्यात घेतले. पीडितेकडे चौकशी केल्यानंतर आरोपीन तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला भाडेतत्त्वावर दौंड येथे खोली घेऊन तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे सांगितले. याप्रकरणी धिवारला अटक केली होती.खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी दहा साक्षीदार तपासले. गणेशने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. घोगरे-पाटील यांनी केली.खटल्यात पीडित मुलीची साक्ष, आरोपीने मुलीला नाथाची वाडी येथे लपवून ठेवले होते तेथील घरमालकाची साक्ष, घटनेच्या वेळी तिचे असणारे वय याचा विचार करून न्यायालयाने त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.गुन्ह्यातील मुद्देमाल वेळेवर जमा होणे, आरोपी मळून न येणे आणि लवकर तारखा न मिळाल्याने खटले अनेक वर्षे सुरू राहतात. मात्र याप्रकरणात पोलिसांनी अगदी चांगल्याप्रकारे तपास करीत वेळेत सीए रिपोर्ट मिळाला आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तारखादेखील लवकर मिळत गेल्या. त्यामुळे हे प्रकरण केवळ २० महिन्यांत निकाली निघाले.- अ‍ॅड. विलास घोगरे-पाटील

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी