पाऊस नसल्याने भातपीक धोक्यात
By Admin | Updated: July 13, 2015 23:55 IST2015-07-13T23:55:45+5:302015-07-13T23:55:45+5:30
पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी

पाऊस नसल्याने भातपीक धोक्यात
घोडेगाव : पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली होती; मात्र सध्या पाऊस नसल्याने ही रोपे पिवळी पडली असून, त्यामुळे पूर्ण भातपीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात २ लाख २९८ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे कृषी विभागाचे नियोजन आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात भात, बाजरी, भुईमूग, नाचणी, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात.
यात भाताचे ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र आहे. भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील पश्चिम भागात
पडत असलेल्या पावसामुळे येथे
भात उत्पादकांना दिलासा मिळाला असून तेथील भात लावणी बऱ्यापैकी उरकत आली आहे. मात्र, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील चित्र विदारक आहे.
जून महिन्यात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली. लवकर पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले; परंतु अचानक पाऊस गायब झाल्याने भाताची रोपे जळून जाऊ
लागली आहेत.
पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे वर्षातील एकमेव भात हे पीक धोक्यात आल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)